Pune Crime News | मोक्का कारवाई नंतर गायब झालेला सराईत गुन्हेगार सुलतान उर्फ टिप्या पोलिसांच्या जाळयात, उस्मानाबाद जिल्हयातून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  मोक्का अंतर्गत कारवाई केल्यानंतर फरार झालेला टोळी प्रमुख सुलतान (Sultan) उर्फ टिप्याला बंडगार्डन पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याला उस्मानाबाद येथून पकडण्यात आले आहे.

सुलतान (Sultan) उर्फ टिप्या लतीफ शेख (रा. बंडगार्डन) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
सुलतान उर्फ टिप्या हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
दरम्यान त्याने व त्याच्या साथीदारांनी एकावर वार करत खुनाच्या प्रयत्न केला होता.
याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या टोळीची ताडीवाला परिसरात दहशत होती. त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरु होत्या.
त्यामुळे बंडगार्डन पोलिसांनी या टोळीवर मोक्कानुसार कारवाई केली होती.
मोक्काची कारवाई झाल्यानंतर सुलतान (Sultan) उर्फ टिप्या हा पसार झाला होता तो पोलिसांना सापडत नव्हता.
दरम्यान तो उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील आरळी गावात असल्याची माहिती मिळाली.
त्याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून उपनिरीक्षक राहुल पवार, प्रकाश सावंत व सागर घोरपडे यांच्या पथकाने एका घरातून पकडले.

Pune Crime News : पुण्यात रक्तचंदनाची तस्करी करणार्‍या तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं पकडलं; 27 लाखाचा माल जप्त

ही कारवाई परिमंडळ दोनचे उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदशर्नाखाली पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक अभय महाजन, उपनिरीक्षक राहुल पवार, प्रकाश सावंत व सागर घोरपडे यांच्या पथकाने केली आहे.

Pune News | ठराविक ‘पदाधिकार्‍यांच्या’ प्रस्तावांना मंजुरीवरून सत्ताधारी ‘नगरसेवकांमध्ये’ असंतोष ! असंतुष्ट नगरसेवकांची ‘आंदोलना’ची तयारी

Web Title : Pune Crime News Sarait criminal Sultan alias Tipya, who went missing after moccasin operation, arrested by police in Osmanabad district