Pune Crime News | सराईत वाहनचोराच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, 6 गुन्हे उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात वाहन चोरी (Vehicle Theft) करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखा युनिट चारने (Crime Branch Unit 4) अटक केली आहे. आरोपीकडून सहा गुन्हे उघडकीस आणून 2 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई (Pune Crime News) 3 फेब्रुवारी रोजी पर्णकुटी चौकात करण्यात आली.

गोविंदराज उर्फ गोविंद माधवराव वाघमारे (रा. सनसवाडी, मुळ रा. मु पो जांभळीगाव, ता. मुखेड, जि. नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे शहरात वाहन चोरीचे गुन्हे वाढत असल्याने गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस अधिकारी व कर्मचारी आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार हरीश मोरे (Harish More) व नागेशसिंग कुंवर (Nagesh Singh Kunwar) यांना माहिती मिळाली, की सराईत वाहन चोर पर्णकुटी चौकात उभा असून त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची आहे. पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. (Pune Crime News)

आरोपीकडे चौकशी केली असता त्याने येरवडा (Yerwada Police Station), कोरेगाव पार्क (Koregaon Park Police Station), दिघी (Dighi Police Station), निगडी पोलीस ठाण्याच्या (Nigdi Police Station) हद्दीतून वाहन चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडून सहा गुन्ह्यातील 2 लाख 80 हजार रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करुन सहा वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. पुढील तपासासाठी आरोपीला येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर
(ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने
(Police Inspector Ganesh Mane), सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव (API Vikas Jadhav),
पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील (PSI Jaideep Patil), पोलीस अंमलदार महेंद्र पवार, हरिष मोरे,
नागेशसिंग कुंवर, हरिष मोरे, विनोद महाजन, रमेश राठोड, मनोज सांगळे, शितल शिंदे यांच्या पथकाने केली.

Web Title :-  Pune Crime News | Sarait Vehicle Theft Crime Branch opened the door, 6 crimes were revealed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Bypoll Election | एवढीच ताकद होती तर टिळक, घाटे, बापट यांना निवडून आणण्यात काय अडचण होती ?

Pune Crime News | कोरोना, लॉकडाऊनपासून बंद पडलेल्या पण आता सुरू झालेल्या ‘एमओबी’मध्ये 20 गुन्हेगारांची ‘परेड’

Repo Rate Hiked | आरबीआयचा सर्वसामान्यांना पुन्हा झटका, रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ; तुमचा EMI कितीने वाढणार? जाणून घ्या