Pune Crime News | सराईत वाहन चोराला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक, रिक्षा व दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. त्याच्याकडून रिक्षा व दुचाकी असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करुन दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही करवाई कात्रज-कोंढवा रोडवरील गोकुळनगर येथे केली. दिपक दत्तात्रय जमादार (वय-18 रा. स्टोन रीच अपार्टमेंट, महादेव मदिराजवळ, पिंपरी गाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Crime News)

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharati Vidyapeeth Police Station) हद्दीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले (Police Mitesh Chormole), अवधुत जमदाडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी यांना माहिती मिळाली की, पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील ज्युपीटर (एमएच 12 पी.एस. 1814) गाडी रेकॉर्डवरील आरोपी दिपक जमादार याच्याकडे आहे. तो कात्रज कोंढवा रोडवरील गोकुळनगर येथे थांबला आहे.

पोलीस पथकाने गोकुळनगर येथील गल्ली नं. 1 येथून आरोपीला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याला गुन्ह्यात अटक करुन सोखोल चौकशी केली असता हा गुन्हा त्याचा साथीदार महेश चव्हाण याच्या मदतीने केल्याची कबुली दिली. अटके दरम्यान केलेल्या चौकशीत त्याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या (Vishrantwadi Police Station) हद्दीतून रिक्षा (एमएच 12 क्यू.आर. 1559) चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून दीड लाख रुपये किंमतीची एक दुचाकी व रिक्षा जप्त करुन वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. (Pune Crime News)

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil),
सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Sr PI Vinayak Gaikwad),
पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणिक (PI Vijay Puranik), पोलीस निरीक्षक गुन्हे गिरीश दिघावकर (PI Girish Dighavkar),
सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ (API Amol Rasal), पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता (PSI Dhiraj Gupta),
पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अवधुत जमदाडे, आशिष गायकवाड,
अभिनय चौधरी, मंगेश पवार, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव,
निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा केला बनाव, लोणी काळभोर पोलिसांकडून काही तासात गुन्हा उघड; आरोपीला अटक