Pune Crime News | ससून हॉस्पीटलच्या वॉर्ड नं. 16 मधून आरोपीचे पलायन, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | येरवडा जेलमधून उपचारासाठी ससून हॉस्पीटलच्या वॉर्ड नंबर 16 मध्ये दाखल झालेल्या आरोपीने सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पलायन केले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)

ससून हॉस्पीटलच्या गेटवर तब्बल 2 कोटी रूपयांचे अंमली पदार्थ पोलिसांनी दोन दिवसांपुर्वीच जप्त केले होते. त्यामुळे ससून हॉस्पीटीलमधील भोंगळ कारभार चव्हाटयावर आला होता. वॉर्ड नं. 16 मध्ये येरवडा जेलमधून उपचारासाठी ससून मध्ये आलेल्या बंद्यांवर उपचार केले जातात. त्यापैकी एका आरोपीने पलायन केल्याची माहिती समोर आली आहे.

वॉर्ड नं. 16 च्या समोर पोलिस गार्ड असतात. तेथे तगडा बंदोबस्त असतो. असे असताना देखील वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या आरोपीने कसे पलायन केले हा प्रश्न अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे.

ललीत अनिल पाटील असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर दोन दिवसापुर्वी अंमली पदार्थ तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुर्ववैमनस्यातून नाना पेठेत भरदिवसा दोघांवर खुनी हल्ला; एकाची प्रकृती चिंताजनक, प्रचंड खळबळ