Pune Crime News | बायका, पोरांची विक्री करुन पैसे परत कर ! डॉक्टरी व्यवसायाबरोबर विनापरवाना सावकारी करणार्‍या डॉक्टरवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | व्यवसाय वाढीसाठी त्याने ४ टक्के व्याजाने पैसे घेतले. मालासाठी इंदोरच्या व्यापाराला पैसे दिले. पण, लॉकडाऊनमुळे तो स्वत: इंदोरला अडकून पडला तर त्या व्यापार्‍याने मालच पाठविला नाही. ज्यांना माल पाठविला, त्या व्यापार्‍यांचा कोरोनामध्ये मृत्यु झाल्याने मालाचे पैसे मिळाले नाही, अशा चारही बाजूने अडचणीत आलेल्या व्यावसायिकाला एका डॉक्टरने आपल्या गुंड साथीदारांसह वेळोवेळी मारहाण (Beating) करुन बायका, पोरांची विक्री करुन पैसे आणून दे, अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी पोलिसांनी विनोद गोपीचंद मेहेर Vinod Gopichand Meher (वय ३९, रा. आळेफाटा, ता. जुन्नर) या डॉक्टराविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत आंबेगाव खुर्द येथील एका ४६ वर्षाच्या व्यवसायिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु.रजि. नं. १००/२३) दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा अ‍ॅग्रो कमोडेटी ट्रेडिंगचा (Agro Commodity Trading) व्यवसाय आहे. आळेफाटा येथे डॉक्टरी व्यवसाय करणारे विनोद मेहेर यांना त्यांनी आपल्या व्यवसायात पैसे गुंतविण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी त्यात आपल्याला रस नाही. तुम्हाला ४ टक्के व्याजाने पैसे देतो, असे सांगून त्यांना एप्रिल २०१९ मध्ये २५ लाख रुपये दिले. त्यातील २ लाख रुपये त्यांनी व्याज म्हणून कापून घेतले. ऑक्टोबर २०१९ पर्यंत व्यवहार सुरळीत सुरु होता. त्यानंतर त्यांनी आणखी २५ लाख रुपये व्याजाने घेतले. फेब्रुवारी व मार्च २०२० मध्ये त्यांनी ३४ लाख ५० हजार रुपयांचा गहू इंदोर येथून घेतला. त्यासाठी ते इंदोर येथे गेले. त्यावेळी लॉकडाऊन पडल्याने ते इंदोरला अडकून पडले. तेव्हा तेथे माल मिळाला नाही व पैसेही परत मिळाले नाही. नंतर पुण्यात आल्यावर त्यांनी इंदापूर, कराड येथील व्यापार्‍यांशी व्यवहार केला होता. त्या दोघांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे २२ लाख रुपये त्यांना मिळाले नाही. (Pune Crime News)

त्यामुळे विनोद मेहेर यांची रक्कम फिर्यादी परत करु शकले नाही. सप्टेबर २०२० मध्ये ते मुंबईला जात असताना विनोद मेहेर व त्यांच्या गुंड मित्रांनी त्यांना वाटेत अडविले. तुला दिलेले पैसे व्याजासह परत कर.
नाही तर तुझे काय करुन टाकून ते तुला समजणार नाही.
तू बाहेर आला आहेस तुझे जगणे मुश्कील करुन टाकू, अशी धमकी दिली.
त्यानंतर नोव्हेबर २०२० मध्ये आंबेगाव खुर्द येथील घरी येऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुझ्या बायको,
पोरांची विक्री करुन पैसे आणून दे. नाही तर तुझ्या घरच्यांना मारुन जीवे ठार मारुन टाकू, अशी धमकी दिली.
त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून त्यांना मारहाण करण्यात आली.

 

गुन्हे शाखेने याचा तपास करुन डॉक्टरी व्यवसायाबरोबर विनापरवाना सावकारी करणार्‍या डॉक्टरवर गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Sell ​​wife and boys and return the my money! Offense
against doctor practicing moneylending without license in connection with medical profession

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा