Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार, कोंढवा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केले. तसेच लग्नाबाबत विचारणा केल्यावर टाळाटाळ करुन फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार (Pune Crime News) जानेवारी 2019 ते 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान कोंढवा परिसरात घडला आहे.

याप्रकरणी सुखसागर नगर परिसरात राहणाऱ्या पीडित 32 वर्षीय महिलेने वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश हनुमंतराव नाईकवाडे Avinash Hanumantrao Naikwade (वय-32 रा. वंडर स्कूल जवळ, गोकुळनगर, पुणे) याच्याविरुद्ध आयपीसी 376 (2)(एन), 420 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत घडला असल्याने वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपासासाठी कोंढवा पोलिसांकडे वर्ग केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी हे मागील काही वर्षापासून एकमेकांच्या
ओळखीचे आहेत. आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
पीडित महिलेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली.
तसेच महिलेसोबत संपर्क करणे बंद करुन तिची फसवणूक केली.
अविनाश आपल्याला टाळत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार केली.
पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Sexual assault on a woman by luring her into marriage, an incident in Kondhwa area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | बाळासाहेब थोरात यांना भाजपमध्ये प्रवेश देणार का? यावर स्पष्टचं बोलले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे; म्हणाले…

Balasaheb Thorat | काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर; काँग्रेसनेते बाळासाहेब थोरांत यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा?

Kasba Constituency Bypolls | जाणून घ्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे शिक्षण आणि संपत्ती