Pune Crime News | जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार, 5 आरोपींना अटक; कोंढवा पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | जुन्या वादाच्या कारणातून एका युवकावर टोळक्याने हल्ला करुन धारदार शस्त्राने वार केले. तर युवकाला वाचवण्यासाठी आलेल्या दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली होती. हा प्रकार 14 जानेवारी रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास कोंढवा येथील समतानगर येथे घडला होता. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पाच जणांना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बेलापुर येथून अटक केली आहे. (Pune Crime News)

शेहबाज मोद्दीन खान (वय-30 रा. कृष्णानगर, मोहंमदवाडी, पुणे), बालाजी तिमन्ना मंगाली (वय-35 रा. येवलेवाडी, पुणे), सुरज राजेंद्र सरतापे (वय-25 रा. चिमटा वस्ती, फातिमानगर, पुणे), जुबेर कुद्दुस कुरेशी (वय-35 रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे), रॉकी ईर्दी अॅन्थोनी (वय-31 रा. वानवडी बाजार, पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अमीत जयराम सपकाळ (वय-34 रा. कोहिनुर बी झोन, कमेला कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी सनी चव्हाण (वय-32), अनिश चव्हाण (वय-35 दोघे रा. समतानगर, कोंढवा रोड), शेहबाज शेख (वय-36 रा. कृष्णानगर) व इतरांवर आयपीसी 307, 326, 324, 143, 144, 147, 148, 149, 323, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी यांचा मित्र झैनुद्दीन शेख उर्फ कल्लू (वय-32) याचे आणि आरोपींमध्ये जुने वाद होते. याच कारणावरुन आरोपी कल्लू याला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेले. त्यावेळी फिर्यादी यांनी भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली. तर गल्लीतून आलेल्या शेहबाज शेख याने कमरेला लावलेले धारदार हत्यार काढून कल्लूच्या डोक्यात आणि हातावर मारुन गंभीर जखमी केले. त्यावेळी फिर्यादी व त्यांचा मित्र कासीम सय्यद हे कल्लू याला वाचवण्यासाठी गेले असता आरोपींनी त्या दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात फिर्यादी अमीत सपकाळ यांच्या डोक्याला व हाताला धारदार हत्यार लागल्याने ते जखमी झाले होते.

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार सतिश चव्हाण व विशाल मेमाणे यांना माहिती मिळाली की,
आरोपी अकोले तालुक्यातील बेलापुर येथील शेतातील झाडावर मचान बांधुन लपून बसल्याचे समजले.
त्यानुसार पथकाने बेलापुर येथे जाऊन आरोपींना सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडे फरार आरोपी बाबत चौकशी
करुन रॉकी अॅन्थोनी याला राहत्या घरातून अटक केली. आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक
विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त शाहुराव साळवे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील, लेखाजी शिंदे, तपासी अधिकारी बालाजी डिगोळे,
पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, लवेश शिंदे, सुजित मदान, लक्ष्मण होळकर, शाहीद शेख, संतोष बनसुडे,
सुरज शुक्ला यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Alandi Accident News | भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, तरुणीचा जागीच मृत्यू; आळंदी परिसरातील घटना

पिंपरी : बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, घरात घुसून कोयत्याने तोडफोड

ACB Trap Case | जमिनीच्या व्यावसायिक वापराच्या परवानगीसाठी 5 लाखांची लाच घेणारे मुख्याधिकारी, नगररचनाकार जाळ्यात

Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; डंपरची ट्रॅव्हल्सला धडक, अपघातात सात जण जखमी

Pune Koregaon Park Crime | कोरेगाव पार्क येथील फ्लॅटमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका