Pune Crime news | पुणे क्राईम न्युज : शिवाजीनगर पोलीस स्टेशन – जंबो कोविड सेंटर – पीएमआरडीए | ‘या’ कारणासाठी संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्यासह डॉ. हेमंत गुप्ता, संजय शहा आणि राजू साळुंखेविरूध्द फसवणूकीचा गुन्हा, जाणून घ्या सविस्तर

पुणे : Pune Crime News | कोविड काळात बनावट पार्टनरशीप डिड तयार करुन त्याद्वारे पुण्यातील जंबो कोविड सेंटर (Jumbo Covid Center Pune) उभारण्याची निविदा मंजूर (Tender) करुन घेऊन पीएमआरडीएची (PMRDA) फसवणूक केल्याप्रकरणी (Cheating Case) शिवाजीनगर पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार देऊन त्यात 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. यामुळे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Pune Crime News)

याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) कार्यकारी अभियंता राजु ठाणगे (Executive Engineer Raju Thange) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८०/२३) दाखल केली आहे. त्यानुसार डॉ. हेमंत रामशरण गुप्ता (Dr. Hemant Ramsharan Gupta), सुजीत मुकुंद पाटकर (Sujit Mukund Patkar), संजय मदनराज शहा (Sanjay Madanraj Shah), राजू नंदकुमार साळुंखे (Raju Nand Kumar Salunkhe) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्याा माहितीनुसार, खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटलला पुण्यातील शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी कॉलेजच्या मैदानावर उभारलेल्या कोवीड जंबो सेंटरचे कत्रांट दिले होते. वैद्यकीय सेवा परिचलनासाठी निवीदा प्रक्रियेत निवड होण्याकरीता बनावट पार्टनरशीप डिड (Fake Partnership Deed) दाखल करुन ही निविदा मंजुर करुन पुणे महानगर विकास प्राधिकरणांची फसवणूक केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.

या फिर्यादीत म्हटल्यानुसार, कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे काळात पुणे व पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील उपलब्ध आरोग्य सुविधा अपुर्‍या पडत असल्याने दोन कोवीड रुग्णालय युद्धपातळीवर उभारणी करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी २१ जुलै २०२० रोजी आदेश दिले होते. त्यात शिवाजीनगर येथील सीओईपी मैदान (COEP Ground) व पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियम (Annasaheb Magar Stadium Pimpri) ही ठिकाणे निश्चित करण्यात आली.

त्यातील सीओईपी मैदानावरील कोवीड सेंटरची उभारणी व त्यांचे परिचलन करण्याचे काम लाईफलाईन हॉस्पिटल (Lifeline Hospital) यांना देण्यात येऊन हे कोवीड सेंटर 26 ऑगस्ट 2020 रोजी सुरु झाले होते.
हे कोवीड सेंटर सुरु झाल्यानंतर त्याविषयी अनेक तक्रारी महापालिकेकडे येत होत्या. 800 बेडसाठी निश्चित करण्यात आलेले असताना आवश्यक वैद्यकीय तज्ञ अधिकारी व अन्य कर्मचारी उपलब्ध नव्हते.
रुग्णांना नाश्ता व भोजन वेळेत उपलब्ध होत नव्हते.
डेड बॉडी मॅनेजमेंट व्यवस्थित होत नसल्याने आय सी एम आर पोर्टलवर नोंदणी करणे शक्य झालेले नाही.
संशयित रुग्णांसाठी 50 बेड उपलब्ध करण्याचे निर्देश देऊनही फक्त 10 बेड उपलब्ध करण्यात आले.
अनेकांना जाणीव पूर्वक दाखल करुन घेतले जात नव्हते. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी 3 सप्टेबर 2020 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली. सेवेत त्रुटी असल्याचे लक्षात आल्यावर पीएमआरडीएने लाईफलाईन हॉस्पिटलची सेवा खंडित केली. तसेच त्यांना काळ्या यादीत समाविष्ट केले़ सेवा खंडीत केल्याबरोबर त्यांनी दिलेले 14 लाख 51 हजार 740 रुपये व 40 लाख 28 हजार 48 रुपयांचे वैद्यकीय सेवा पुरविल्याबाबतचे बिल 29 ऑक्टोबर 2020 ला पीएमआरडीएला मिळाले. त्यांना काळ्या यादीत टाकल्याने कोणतेही बिल देण्यात आले नाही. तसेच बँक हमी म्हणून दिलेली 25 लाख रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली.

माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी 10 मार्च 2023 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला.
त्यात त्यांनी मुंबई व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडे सादर केलेल्या भागीदारी पत्रांमध्ये
तफावत आढळून आली आहे. मुंबई महापालिकेला ४ नॉन ज्युडीशियल स्टँपेपरचा वापर केला आहे.
तर पीएमआरडीकडे सादर केलेल्या 2 नॉन ज्युडीशियल स्टँपपेपरचा वापर केला आहे.
दोन्ही ठिकाणी सादर केलेले स्टँप पेपर पुन्हा वापरण्यात आले.
परिणामी सदोष अथवा बनावट असे भागीदारी पत्र दोन्हीकडे सादर केलेले आहे.
एका ठिकाणी भागीदारांच्या स्वाक्षरी नाही तर एका ठिकाणी स्वाक्षरी आहे. तसेच दोन्हीकडील तारखा वेगवेगळ्या आहेत.

Advt.

मुंबई महापालिकेकडे (BMC) सादर केलेल्या भागीदारी पत्रामध्ये एकूण मुळ भांडवल हे 1 लाख रुपये दाखविण्यात
आले आहे. तर, पीएमआरडीएकडे सादर केलेल्या भागीदारी पत्रामध्ये ते 50 हजार रुपये दाखविले आहे.

विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली 19 एप्रिल रोजी सुकाणु समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली.
त्यात झालेल्या चर्चेनुसार लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटने वैद्यकीय सेवा पुरविण्याचे काम निविदेच्या
माध्यमातून मिळविण्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आली.
त्यामुळे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची फसवणूक केली असल्याने
या फर्मविरुद्ध तसेच त्यांचे भागीदार यांच्यावर कलम 420, 406, 465, 467, 468, 471, 511, 34 खाली गुन्हा
दाखल करण्याची कायदेशीर फिर्याद देण्यात आली आहे.

Web Title :- Pune Crime news | Shivajinagar Police Station – Jumbo Covid Center Pune – PMRDA | Dr. Sujit Patkar, who is close to Sanjay Raut for ‘this’ reason. Cheating case against Hemant Gupta, Sanjay Shah and Raju Salunkhe, know in detail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | ‘काहीही झालं तरी महाराष्ट्रात भूकंप होणारच’, अंबादास दानवेंचं मोठं वक्तव्य

Pune Mahavitaran News | महावितरणच्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

MLA Amol Mitkari | ‘ही सैतानी साम्राज्याची सुरुवात, ज्या दिवशी…’, ‘त्या’ प्रकरणावरून अमोल मिटकरींचा सरकारला इशारा