Pune Crime News | धक्कादायक ! पुण्यात परीक्षा केंद्रावरील महिला सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये 10 वी गणिताच्या पेपरचा फोटो; पेपरफुटीचा प्रकार असल्याचा भरारी पथकाला संशय

पुणे : Pune Crime News | बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात (Yashwantrao Chavan Vidyalay in Bibvewadi Pune) सुरक्षा रक्षक म्हणून काम करणार्‍या महिलेच्या (Lady Security Guard) मोबाईलमध्ये दहावीचा गणिताचा पेपरचा फोटो आढळून आला. त्यामुळे पेपरफुटीचा (Pune Paper Leak Case) हा प्रकार असल्याचा भरारी पथकाला (Flying Squad) संशय आहे. (Pune Crime News )

याबाबत भरारी पथकाचे प्रमुख किसन भुजबळ यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७१/२३) दिली आहे. त्यानुसार मनिषा संतोष कांबळे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News )

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथील यशंवतराव चव्हाण माध्यामिक विद्यालयात दहावीची परीक्षा (SSC Exam) सुरु आहे. तेथे महापालिकेच्या सुरक्षा रक्षक मनिषा कांबळे यांची ड्युटी लावण्यात आली आहे. त्यांची मुलगीही याच परीक्षा केंद्रात दहावीची परीक्षा देत आहे. बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजता भरारी पथकाने या केंद्राला भेट दिली. तेव्हा मनिषा कांबळे या मोबाईलमध्ये काहीतरी करत होत्या.

परीक्षा सुरु असताना मोबाईल वापरण्यास बंदी असतानाही त्या मोबाईल वापरत असल्याने भरारी पथकाला संशय आला.
त्यांनी त्यांचा मोबाईल तपासला असता त्यात १३ मार्च रोजीचा गणित भाग १ या विषयाचा इंग्रजी माध्यमाचा
एन ९१३ विषयकोड असलेल्या प्रश्न पत्रिकेचा पान क्ऱ ८ /एन ९१३ या पानाचा फोटो काढलेला आढळून आला.
त्यांच्याविरुद्ध ते १३ मार्च रोजी संबंधित ब्लॉकचे सुपरवायझर यांच्या विरुद्ध महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंधक
कायदा १९८२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षा रक्षकांना वर्गामध्ये जाता येत नाही.
त्यांनी बाहेर सुरक्षेचे काम करायचे असते. असे असताना त्यांच्याकडे या पेपरचे पान कसे आले.
त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Shocking! 10th paper in mobile of female security guard at exam center in Pune; Flying Squad suspects that it is a type of paper leak case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Symptoms Of Influenza Virus | इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार करून घ्यावेत; सार्वजनिक आरोग्य मंत्र्याचे आवाहन

Suresh Hemnani | महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीच्या सदस्यपदी सुरेश हेमनानी यांची नियुक्ती

MLA Siddharth Shirole | सार्वजनिक स्वच्छतागृहांचा दर्जा सुधारावा; विशेष निधीच्या तरतुदीची गरज – आमदार सिद्धार्थ शिरोळे