Pune Crime News | धक्कादायक ! पुण्यात रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने सपासप वार, पोलीस गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गुन्हेगारांकडून पोलिसांवर देखील हल्ले होत असल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला आहे की नाही, असा प्रश्न पुणेकरांना (Pune Crime News) पडला आहे. असाच एक प्रकार पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Viman Nagar Police Station) हद्दीत घडला आहे. रात्री उशीरापर्यंत सुरु असलेले चायनिज सेंटर बंद केल्याच्या रागातून एकाने बीट मार्शल वर चाकूने सपासप वार (Stabbing Beat Marshall) केले. यामध्ये पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

 

पोलीस नाईक सचिन उत्तम जगदाळे (Sachin Uttam Jagdale) असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी महानंदेश्वर उर्फ मल्ल्या महादेव बताले (वय-24 रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) याच्यावर आयपीसी 353, 333, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (दि.14) रात्री सव्वा अकराच्या सुमारास समायरा चायनिज सेंटर, धानोरी जकात नाका, लोहगाव येथे घडला. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस नाईक सचिन जगदाळे हे लोहगाव बीट मार्शलवर पेट्रोलींग करत होते. त्यावेळी त्यांना प्राप्त झालेल्या कॉलनुसार ते समायरा चायनीज सेंटर बंद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी जेवण करण्यासाठी आला होता. त्याला जेवण मिळाले नसल्याच्या रागातून त्याने चायनिज सेंटर मधील चाकूने जगदाळे यांच्या डाव्या गालावर वार केला. यामध्ये जगदाळे हे गंभीर जखमी झाले आहेत. आरोपी बताले याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

घटनेची माहिती मिळताच रात्रगस्त अधिकारी पोलीस उपायुक्त मुख्यालय रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar),
विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे (Senior Police Inspector Vilas Sonde),
पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप (Police Inspector Mangesh Jagtap),
पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम चक्रे (Police Inspector Uttam Chakre),
सहायक पोलीस निरीक्षक एम.एस. पाठक (API M.S. Pathak) यांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमी सचिन जगदाळे यांना तातडीने खासगी दावाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Shocking! A policeman on night patrol in Pune was stabbed with a knife, the policeman was seriously injured

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sandeep Varal Murder Case | अपर पोलीस अधीक्षकांची वेतनवाढ रोखली, तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका

Nepal Plane Crash | नेपाळमध्ये यती एअरलाइन्सचे विमान कोसळलं, 32 जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

Jalgaon Crime | जळगाव हादरलं! 16 वर्षीय मुलासोबत आरोपीने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य