पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पंधरा दिवसांपूर्वी येरवडा कारागृहात (Yerawada Jail) मोबाईल सापडल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर कारागृह प्रशासनाने घेतलेल्या झडती मध्ये आणखी एक सीमकार्ड नसलेला मोबाईल सापडल्याचा (Mobile Phones Found) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News) कारागृहात कडक पोलीस बंदोबस्त असताना मोबाईल कारागृहात गेलाच कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत तुरुंग अधिकारी अतुल तुवर (Jail Officer Atul Tuvar) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुवर हे येरवडा कारागृहात तुरुंग अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कारागृहामध्ये असलेल्या कैद्यांच्या बरॅक आणि आजुबाजूच्या परिसराची नियमित झडती घेत असतात. 6 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सर्कल एक येथील बरॅक क्रमांक 8 परिसरात तुरुंगाधिकारी ए.एस. कांदे (Jailor A.S. Kande) हे झडती घेत होते. (Pune Crime News)
झडती घेत असताना कांदे यांना एक इंटेल कंपनीचा मोबाईल बॅटरीसह सापडला. मात्र त्या मोबाईल मध्ये सीमकार्ड नव्हते. याबाबत प्रभारी अधीक्षक एस.बी. पाटील (Superintendent S.B. Patil) यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यावर तुवर यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयपीसी 188, 120 (ब), कारागृह कायदा 1894 च्या नियम 42, 45 (12) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
Web Title : Pune Crime News | Shocking! Another mobile phone found in Yerawada Jail
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- ACB Trap Case News | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सहायक उद्यान निरीक्षक आणि उपलेखापाल लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Pune PMC News | रस्ते सुशोभीकरणासाठी मोठ्या कुंड्या आणि झाडांची खरेदी वादात ! कुंड्या आणि झाडांच्या किंमतीबाबत खातरजमा करूनच खरेदीचा निर्णय घेण्यात येईल – महापालिका आयुक्त विक्रम कुमार
- Chitra Wagh | ‘संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांनी आपला डीएनए तपासावा’, दंगलीवरुन चित्रा वाघ यांचा घणाघात (व्हिडिओ)
- Ex Servicemen Wife Pune | माजी सैनिकांच्या पत्नींनी अधिक्षीका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन