Pune Crime News | धक्कादायक ! मेफेअर सोसायटीजवळ महिलेचा खून झाल्याचे उघड, कोंढव्यातील दोन अल्पवयीन ताब्यात

पुणे : Pune Crime News | कोंढव्यातील मेफेअर इलिगंझा सोसायटीच्या ((Mayfair Society Kondhwa) समोरील रिकाम्या प्लॉटमध्ये विवस्त्र अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या खूनाचा (Murder In Pune) उलघडा लावण्यात कोंढवा पोलिसांना (Kondhwa Police) यश आले आहे. त्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Pune Police) दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी या महिलेवर अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Abuse) केल्याचे समोर आले आहे. या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेयफेर इलिगंझा सोसायटीच्या समोर असणार्‍या साई मंदिरालगतच्या रिकाम्या प्लॉटमध्ये बोरीच्या झाडाखाली एक महिलेचा मृतदेह आढळून आला.
तिची ओळख पटू नये, म्हणून तिच्या चेहरा विद्रुप करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना शिवनेरीनगर येथील दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी संशयावरुन ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला. कोंढव्यातील या ठिकाणी एक महिला व एक पुरुष फुटपाथ जवळील कट्ट्यावर दारु पित बसले होते. हे दोघे मुले बियर पिण्यासाठी तेथे आले होते. झाडीमध्ये पाईपावर बसून ते बियर पित असताना ही महिला या दोघांजवळ आली. त्यावेळी त्यांच्यातील एकाने या महिलेवर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यावेळी तिने विरोध केल्याने त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा त्या दोघांनी तिच्या तोंडावर दगड मारुन तिचा खून करुन पळून गेले होते. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक मोगले (Police Inspector Mogle) तपास करीत आहेत. (Pune Crime News)

Web Title :-  Pune Crime News | Shocking! It is revealed that a woman was murdered near Mayfair Society, two minors from Kondhwa are detained

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil On Pune Koyta Gang | पुणे शहरात उच्छाद घालणार्‍या कोयता गँगवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; पालकमंत्री म्हणाले – ‘वशिल्याने झालेल्या पोलिसांच्या बदल्याचा हा परिणाम’

Maharashtra Politics | ‘तो माझ्या आयुष्यातील दु:खाचा क्षण’, उद्धव ठाकरेंपासून फारकत घेतलेल्या आमदाराचं वक्तव्य

MLA Laxman Jagtap Passed Away | भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन