Pune Crime News | धक्कादायक ! पुणे महापालिकेचा बहुउद्देशीय हॉल बळकावला, परस्पर हॉल भाड्याने देऊन पैसे कमावणाऱ्या तोतया मालकाचा शोध सुरु; कोंढव्यातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे महानगरपालिकेने बांधलेला बहुउद्देशीय हॉल परस्पर ताब्यात घेऊन तो भाड्याने देऊन पैसे कमवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून कोंढवा पोलिसांकडून तोतया मालकाचा शोध घेतला जात आहे. हा प्रकार (Pune Crime News) 3 मार्च ते 6 मार्च या कालावधीत प्रभाग क्रमांक 27 साईबाबा नगर कोंढवा येथील इमाम आझम (अबु हनिफा) बहुउद्देशीय हॉल (Imam Azam (Abu Hanifa) Multi-Purpose Hall) येथे घडला.

याबाबत मनपाचे समाज विकास विभागाचे कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) विवेकानंद विष्णु बडे Vivekananda Vishnu Bade (वय-44 रा. समर्थ नगर, नवी सांगवी) यांनी सोमवारी (दि.6) कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध आयपीसी 448 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमाक 27 साईबाबा नगर कोंढवा येथे पाच हजार चौरस फुटाचा इमाम
आझम (अबु हनिफा) बहुउद्देशीय हॉल आहे. या हॉलचे बांधकाम मार्च 2022 ला पूर्ण झाले.
तेव्हाच महापालिकेच्या भवन रचना विभागाने तो मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे हस्तांतरित केला आहे.
तेव्हापासून हॉल कुलूप लावून बंद आहे.
अज्ञांनी हॉलचे कुलूप तोडून ताबा घेऊन अतिक्रमण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Shocking! Pune Municipal Corporation’s multi-purpose hall seized, search begins for bogus owner who earns money by renting mutual hall; Type in sheep

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Politics | ‘दादा… पुणेकरांना वाचवा’; काँग्रेस नेत्याकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना पत्र (व्हिडिओ)

Maharashtra Unseasonal Rain | अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aurangabad ACB Trap | दारु विक्रीची परवानगी देण्यासाठी लाचेची मागणी, दोन पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात