पुणे : Pune Crime News | हनीट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकवून एका जेष्ठाला लुटणाऱ्या टोळीत पुणे पोलीस (Pune Police) दलातील पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector – PSI) सामील झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) संबंधित उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होताच उपनिरीक्षक पसार झाला आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ मारुती उभे PSI Kashinath Ubhe ( वय ५५ ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनीट्रॅपमध्ये अडकवून ज्येष्ठाला लुटल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अवंतिका सचिन सोनवणे Avantika Sachin Sonwane ( वय- ३५ ), पूनम संजय पाटील Poonam Sanjay Patil
( वय- ४० ), आरती संजय गायकवाड Arti Sanjay Gaikwad ( वय- ५८, तिघी रा. कोथरुड ) यांना अटक करण्यात आली. पूनम पाटील विरुद्ध काेल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यातही (Shahupuri Police Station) एका डाॅक्टरला ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी (Extortion Case) गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या टोळीने अनेकांना हनीट्रॅपमध्ये ( मोहजालात ) अडकवून लुटल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. कोथरूड भागातील एका जेष्ठाला मोहजालात अडकवून महिलेने एका हॉटेलमध्ये नेले. त्यानंतर पोलीस आणि महिला हक्क आयोगाचे सदस्य असल्याचे सांगून जेष्ठाला मारहाण करण्यात आली.
बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. त्याच्याकडील २० हजारांची रोकड मोबाईल संच काढून घेण्यात आला. २९ जुलै रोजी लक्ष्मी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली होती. याप्रकरणी तीन महिलांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे यांनी सुरु केला.
लक्ष्मी रस्त्यावरील (Laxmi Road Pune) हाॅटेलमध्ये महिलेने आधार कार्ड दिले होते.
पोलिसांनी तपास करून अवंतिका सोनवणेसह, पूनम पाटील, आरती गायकवाड यांना ताब्यात घेतले.
सीसीटीव्ही चित्रीकरणात एक मोटार आढळून आली. तेव्हा मोटार मुळशीतील एकाच्या नावावर असल्याचे समजले.
चौकशीत मोटारीचा वापर पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ उभे करत असल्याचे उघड झाले.
उभे या कटात सामील असल्याचे उघडकीस आले आहे.
हाॅटेल मधील खोलीत महिला हक्क आयोगाचा सदस्य असल्याचे सांगून प्रवेश करणाऱ्या महिलांसोबत उभे असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांना धक्का, माढ्याचे आमदार शिंदेनी घेतली शरद पवारांची भेट;
राजकीय वर्तुळात खळबळ
Pune Crime News | सराईताकडून पिस्टल हस्तगत ! येरवडा तपास पथकाकडून तिघांना अटक