Pune Crime News | जागतिक महिला दिनाला पुण्यात गालबोट, दोन महिलांनी केली आत्महत्या; दौंड तालुक्यातील घटना

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बुधवारी जागतिक महिला दिन संपूर्ण जगभरात साजरा करण्यात आला. महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो. पुण्यात महिला दिन उत्साहात साजरा केला जात असताना दुसरीकडे दौंड तालुक्यात (Daund Taluka) दोन महिलांनी आत्महत्या (Suicide) केल्याचे समोर आले. नेमकं जागतिक महिला दिना (International Women’s Day) दिवशीच दोन महिलांनी आत्महत्या करत (Pune Crime News) आपली जीवनयात्रा संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या (Yawat Police Station) अंतर्गत या दोन्ही घटना घडल्या आहेत. यमुना हनुमंत कारंडे (Yamuna Hanumant Karande) आणि पूनम बाळासाहेब टेकवडे Poonam Balasaheb Tekwade (वय-22 रा. कासुर्डी ता. दौंड, जि. पुणे) असे आत्महत्या करणाऱ्या दोघींची नावे आहेत. या दोघींच्या आत्महत्येचे (Pune Crime News) कारण समजू शकले नाही.

यमुना कारंडे यांचा मृतदेह पारगाव येथील शेतकरी सयाजी ताकवणे यांच्या शेतातील विहिरीमध्ये आढळून आला.
या संदर्भात त्यांचे पती हनुमंत कारंडे यांनी यवत पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
यमुना कारंडे यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. यमुना कारंडे या रयत शिक्षण संस्थेच्या (Rayat Shikshan Sanstha) नागेश्वर विद्यालय पाटस (Nageshwar Vidyalaya Patus) व जय मल्हार विद्यालय देलवडी (Jai Malhar Vidyalaya Delawadi) येथे क्लार्क म्हणून काम करत होत्या.

दुसरी घटना दुपारी कासुर्डी गावाच्या हद्दीत घडली आहे.
पूनम टेकवडे या तरुणीने घरात लोखंडी पत्र्याचे अँगलला साडीने गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केली.
याबाबत लक्ष्मण बजाबा खेनट यांनी यवत पोलिसांना माहिती दिली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे (Police Inspector Hemant Shedge) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Web Title : Pune Crime News | shocking two women commit suicide on international womens day huge excitement in daund taluka

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Khamgaon Jalna Railway Line Project | खामगाव-जालना रेल्वे प्रकल्पासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेणार – मंत्री दादाजी भुसे

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | छत्रपती संभाजी महाराजांचा ‘स्वराज्यरक्षक’ असा उल्लेख केल्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले सरकारचे अभिनंदन

Maharashtra Politics | ’50 खोक्के आणि नागालँड ओक्के’वरुन विधानसभेत गोंधळ, मुख्यमंत्र्यांची सभागृहात डायलॉगबाजी

Ajit Pawar | शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक