Pune Crime News | मेफेनटरमाइन सल्फेट औषध बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्या दुकानदारास अटक

पुणे : बॉडी बिल्डिंगसाठीचे इंजेक्शन (Body Building Injection ) व गर्भपातासाठीच्या गोळ्यांची (Abortion Pills) बेकायदेशीरपणे विक्री करणार्‍या एका मेडिकल दुकानदाराला (Medical Owner) अमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Squad) अटक केली आहे.

मंगेश पोपट नरुटे Mangesh Papat Narute (वय ३३, रा. नर्‍हे, आंबेगाव – Ambegaon Pune) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार उंड्रीमधील संगम मेडिकल अँड लॅबमध्ये (Sangam Medical & Lab) १ मे रोजी रात्री पावणे आठ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री येथील संगम मेडिकलमध्ये बॉडी बिल्डिंगकामी इंजेक्शन
व गर्भपातासाठीच्या गोळयांची विक्री केली जात असल्याची अमली पदार्थ विरोधी पथकाला (Anti-Drug Squad) माहिती मिळाली. त्यानुसार अन्न व औषध विभागाच्या (Food and Drug Department) पथकासह पोलिसांनी दुकानावर बनावट ग्राहक (Fake Customer) पाठवून छापा घातला. मंगेश नरुटे याचा स्वत:चे डी फार्मसी शिक्षण झाले असतानाही त्याने स्वत:च्या ताब्यात मेफेनटरमाइन सल्फेट (Mephentermine Sulfate) हे इंजेक्शनच्या ८ बाटल्या तसेच गर्भपाताच्या गोळ्यांची ७ पाकिटे विक्रीसाठी ठेवलेली आढळून आली. ही औषधे कोणाकडून खरेदी केली. त्याचे खरेदीबिलही त्याच्याकडे आढळून आले नाही. पोलीस निरीक्षक वगरे तपास करत आहे.

Web Title :  Pune Crime News | Shopkeeper arrested for illegal possession of Mephentermine Sulphate drug

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Advt.

हे देखील वाचा

Pune Crime News | नारायणगाव पोलिस स्टेशन – एकाच तरुणीच अनेकांशी विवाह लावून लाखो रुपयांना लुबाडले

Maharashtra Talathi Bharati 2023 | सुशिक्षीत बेरोजगारांसाठी खुशखबर ! राज्यात तलाठी पदासाठी 4 हजार 625 जागांची मेगाभरती, शासनाकडून आदेश जारी

Maharashtra IAS Officer Transfer | राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या, वाचा संपुर्ण यादी

Pune Crime News | 10 टक्के व्याजाने घेतलेले पैसे परत केल्यानंतर देखील पैशासाठी तगादा लावणार्‍या सूरज म्हेत्रेविरूध्द खंडणीचा गुन्हा