Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सिंहगड रोड पोलिस स्टेशन – भांडणे सोडविणार्‍या तरुणावर टोळक्याने कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : Pune Crime News | मित्राच्या भावाच्या लग्नाचा मांडव टहाळा कार्यक्रमात झालेली भांडणे सोडविल्याचा राग धरुन टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) करुन परिसरात दहशत निर्माण केली.

याबाबत सागर दिलीप लोखंडे (वय ३२, रा. कुष्णकुंज सोसायटी, नर्‍हे – Narhe) यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये (Sinhgad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २१२/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी करण जांभळे, गणेश खांडेकर, मोन्या सुर्वे, मयुर परब, अक्षय बारगजे व त्यांचे २ ते ३ साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार नर्‍हे येथील जेएसपीएम रोडवरील दुर्गा कॅफेसमोर बुधवारी रात्री पावणे अकरा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र ऋषिकेशच्या भावाचा लग्नाचा मांडव टहाळा कार्यक्रम होता.
या कार्यक्रमात ऋषिकेश याचे मोन्या सुर्वे यांच्याबरोबर भांडण झाले होते. ही भांडणे फिर्यादी यांनी सोडविली होती.
त्यानंतर बुधवारी रात्री फिर्यादी व त्यांचा मित्र ऋषिकेश हे जेवायला गेले होते.
त्यावेळी मोन्या सुर्वे आपल्या साथीदारासह तेथे आला.
त्याने तेथे दहशत निर्माण करुन थांब तुला मारुन टाकतो, असे मोठमोठ्याने ओरडून फिर्यादीच्या डोक्यास
, हाताचे मनगटावर कोयत्याने वार करुन मारहाण करुन गंभीर जखमी केले.
तसेच फिर्यादी जेवण करीत असलेल्या ठिकाणी दगडफेक केली. खुर्च्या मारुन तोडफोड केली. सहायक पोलीस निरीक्षक यादव तपास करीत आहेत.

Web Title :Pune Crime News | Sinhagad Road Police Station – A gang tried to kill a youth who was trying to settle a dispute with a knife.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bacchu Kadu | ‘दंगल करणारा हिंदू असो वा मुस्लीम, त्यांचे हात छाटले पाहिजे’, आमदार बच्चू कडूंचं मोठं विधान

Tulja Bhavani Temple News | तुळजाभवानीच्या दर्शनासाठी ड्रेसकोड, मंदिर परिसरात झळकले फलक; अचानक घेतलेल्या निर्णयामुळे भाविकांची गैरसोय

Pune Ahmednagar Highway | पुणे- अहमदनगर महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्देश