Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सिंहगड रोड पोलिस स्टेशन – बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू; 3 महिलांसह 5 जणांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | किरकोळ कारणावरून वादावादी झाल्यानंतर बेदम मारहाणीत (Bedum Marhan) गंभीर जखमी झालेल्या 31 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान ससून रूग्णालयात (Sasoon Hospital) मृत्यू झाला आहे. याप्रकरणी 3 महिलांसह 5 जणांविरूध्द सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये (Sinhagad Road Police Station) खूनाचा (Murder In Pune) गुन्हा First Information Report (FIR) दाखल करण्यात आला आहे. 5 जणांनी मिळून युवकास नर्‍हे रोडवरील (Narhe Road Pune) कृष्णाई नगरमधील औदुंबर हाईट्स सोसायटीच्या समोर बेदम मारहाण केली होती. (Pune Crime News)

 

नौशाद शेख, अल्ताफ शेख, जरीना शेख, आमीना शेख, मदीना शेख (सर्व रा. नवदीप सोसायटीजवळ, मानाजीनगर, नर्‍हे, पुणे) यांच्याविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अनिस आमीन शेख (29, रा. 304, सिंग हाईट्स, नवदिप सोसायटीच्या मागे, मानाजीनगर, नर्‍हे, पुणे) यांनी सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. आरोपींनी केलेल्या बेदम मारहाणीत फिर्यादी यांचा भाऊ रईस आमीन शेख (31) यांचा मृत्यू झाला आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच परिसरात राहण्यास असून ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी नौशाद शेखने अनिस यांना फोन करून औदुंबर हाईट्स सोसायटीच्या समोर बोलावून घेतले. अनिस यांचा मयत भाऊ रईस आणि नौशाद यांच्यामध्ये झालेल्या वादावादीच्या कारणावरून जरीना शेख, आमीना शेख आणि मदीना शेख यांनी अनिस यांना हाताने मारहाण केली. त्यावेळी रईस त्या भांडणामध्ये पडला असता त्यास काठीने मारहाण करून जमीनीवार पाडुन त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. काठीने केलेल्या मारहाणीत रईस गंभीर जखमी झाला. त्यांना ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले.
रूग्णालयात उपचारादरम्यान रईस यांचा मृत्यू झाला.

 

Advt.

गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव (API Jadhav) करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Sinhagad Road Police Station – Death of youth seriously injured in brutal beating;
A case of murder has been registered against 5 people including 3 women

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा