Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सिंहगड रोड पोलिस स्टेशन – जिना बांधण्यावरुन विरोध केल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; शेजारी राहणार्‍यांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | येण्यासाठी असलेला लोखंडी जिना काढून त्या जागी सिमेंटचा जिना बांधण्यास विरोध केल्याने तरुणाला त्रास दिला. हा मानसिक त्रास सहन न झाल्याने एका २४ वर्षाच्या तरुणाने गळफास (Galfas) घेऊन आत्महत्या (Suicide In Pune) केली. (Pune Crime News)

 

मनोज मोहन दाभोळकर Manoj Mohan Dabholkar (वय २४, रा. आनंद विहार, हिंगणे – Anand Vihar Hingne Khurd) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडिल मोहन दाभोळकर (वय ५०) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २३३/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अशोक गोपाळ बांडागळे Ashok Gopal Bandagale (वय ५०) आणि कल्पना अशोक बांडागळे Kalpana Ashok Bandagale (रा. आनंद विहार, हिंगणे) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार १० एप्रिल रोजी घडला होता. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच ठिकाणी राहतात. त्यांच्या येण्या-जाण्यासाठी सामाईक लोखंडी जिना होता. बांडागळे यांनी तो जिना काढून तेथे सिमेंटचा जिना बांधण्यास सुरुवात केली. त्याला फिर्यादीचा मुलगा मनोज व पत्नीने विरोध केला. तेव्हा बांडागळे यांनी आम्ही जिना तर बांधणारच तुला काय करायचे ते कर, असे बोलले.
त्याचा मानसिक त्रास करुन घेऊन मनोज याने १० एप्रिल रोजी घरात कोणी नसताना
दोरीचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या (Atmahatya News) केली.
आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. शेजारचे बांडागळे हे बांधकामामुळे आम्हाला त्रास देत आहेत,
म्हणून मी आत्महत्या करत आहे, असे लिहिले होते. याप्रकरणी अकस्मात मृत्यु अशी नोंद करण्यात आली होती.
तपासात हा प्रकार समोर आल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक साबळे (PSI Sable) तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Sinhagad Road Police Station – Youth commits suicide by hanging himself
after protesting against construction of stairs; A case has been filed against the neighbors

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा