Pune Crime News | पुण्यातील मोदीखाना येथे घराचा स्लॅब कोसळला, महिलेसह दोन चिमकल्या जखमी

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे शहरातील (Pune City) नवा मोदीखाना (New Modikhana) येथे आज संध्याकाळी जवळपास 100 वर्षाहून अधिक जुन्या म्हाडीतील पहिल्या मजल्यावरी एका खोलीचा स्लॅब कोसळला (House Slab Collapse). ही घटना आज संध्याकाळी चारच्या सुमारास घडली. दहा बाय दहा खोलीचा स्लॅब कोसळल्याने यामध्ये एका महिलेसह सात वर्षाची एक मुलगी गंभीर जखमी (woman and two others girl injured) झाले. तर दोन इतर लहान मुली किरकोळ जखमी Pune Crime News झाल्या आहेत.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

नवा मोदीखाना (Nawa Modikhana) परिसरात मॉडर्न मोटार ट्रेनिंग स्कूल (Modern Motor Training School) शेजारी कुतुबुद्दीन काझी (Kutbuddin Kazi) यांच्या मालकीची जुनी म्हाडी आहे.
तळमजल्यावर चार तर पहिल्या मजल्यावर चार कुटुंब राहतात.
आज दुपारी चारच्या सुमारास श्रद्धा गायकवाड Shraddha Gaikwad (वय-26) या आपल्या घरामध्ये तीन लहान मुलींची शिकवणी (Teaching girls) घेत होत्या.
त्यावेळी अचानक घराचा स्लॅब कोसळला ( house slab collapse).

या घटनेत श्रद्धा गायकवाड (Shraddha Gaikwad ) यांच्या डोक्याला, कंबर, हात व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तर 6 वर्षाची लहान मुलगी नक्षत्रा कांबळे (Nakshatra Kamble) (वय-7) ही देखील जखमी झाली आहे.
तिच्या खादा, कपाळ व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
तर स्वरा भोसले (Swara Bhosle) (वय-7) या मुलीला किरकोळ दुखापत झाली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कॅन्टोन्मेंट बोर्डाची अग्निशमन दलाची (Cantonment Board Fire Brigade) गाडी घटनास्थळी दाखल झाली.
स्थानिक लष्कर पोलीस (Lashkar police) अधिकारी आणि कर्मचारी हे देखील घटनास्थळी दाखल झाले. सध्या घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम सुरु आहे.

Web Titel : Pune Crime News slab house collapsed modikhana lashkar area pune woman and two others were injured