Pune Crime News | सोलापूर मधील तथाकथित बलात्कारी पत्रकाराने पुण्यातील व्यावसायिकास मागितली 5 कोटीची खंडणी; गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून पाटस टोल नाक्याजवळ गोळीबार, महेश हनमे व दिनेश हनमे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील खराडीमधील इन ऑन आयटी पार्क (EON IT Park Kharadi ) येथे सॉफ्टवेअरचा व्यवसाय (Business of Software) करणार्‍याकडे 5 कोटी रूपयांची खंडणी मागणार्‍यांना (Extortion Case) पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार गुरुवारी (दि.18) दुपारी चारच्या सुमारास पाटस टोल नाक्याजवळ (Patas Toll Plaza) घडला. यावेळी पोलिसांवर गोळीबार (Firing) करणाऱ्या दोन तथाकथित पत्रकारांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या महेश हनमे याच्यावर सोलापूर येथे बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

 

महेश सौदागर हनमे Mahesh Saudagar Hanme (रा. सोलापूर) आणि त्याचा साथीदार दिनेश हनमे (Dinesh Hanme) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी पुण्यातील खराडी परिसरातील एका व्यवसायिकाकडे 5 लाखाची खंडणी मागितली होती. आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस गेले असता खंडणी बहाद्दरांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत गुन्हे शाखेतील पोलिसांनी खंडणीबहाद्दरांवर गोळीबार (Firing In Patas) केला असता गोळी खंडणीबहाद्दरांच्या गाडीच्या पाठीमागील चाकांवर लागली. आरोपी हे तथाकथत पत्रकार असल्याची माहिती समोर येत असून महेश हनमे याच्यावर सोलापूर येथे बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी हे ऑगस्ट 2022 पासून खराडी येथील इ ऑन आयटी पार्कमधील सॉफ्टवेअर व्यावसायिक यांच्याकडे खंडणी मागत होते. त्यांनी तब्बल 5 कोटी रूपयांची खंडणी मागितली होती. आतापर्यंत व्यावसायिकाने त्यांना 3 लाख 80 हजार रुपये दिलेले आहेत. दरम्यान, हनमे याच्याकडून वेळावेळी पैशाची मागणी होत होती. महेश सौदागर हनमे हा स्वतः पत्रकार असल्याचे सांगत होता. त्याने फिर्यादीची बदनामी करण्याच्या उद्देशाने वगेवगळया खोटया बातम्या तयार करून त्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर विविध लोकांना पाठवून पोलिस केस करण्याची धमकी दिली होती. (Pune Crime News)

दरम्यान, आज महेश हनमेने व्यावसायिकास कुठल्याही परिस्थिती 50 लाख रूपये हवे आहेत अशी धमकी दिली होती. त्यासाठी त्याने त्यांना सोलापूर जिल्हयातील मोहोळ येथील हॉटेल स्वराज येथे बोलावले होते. व्यावसायिकाने याबाबतची माहिती गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना दिली होती.

 

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर आयुक्त रामनाथ पाकळे (IPS Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर (Sr PI Pratap Mankar), पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan)
आणि इतर पोलिस अंमलदार हे आरोपींच्या मागावर आज (गुरूवार) मोहोळकडे रवाना झाले.

पोलिस आपल्या मागावर असल्याची चाहूल आरोपींना लागली. पाटस टोल नाक्याजवळ पोलिस गेले असता
तेथे आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत आरोपींवर गोळीबार केला.
गोळ्या गाडीच्या पाठीमागील टायरवर लागल्या आहेत.
पोलिसांनी पाठलाग करून महेश सौदागर हनमे आणि दिनेश हनमे यांना ताब्यात घेतले आहे.
या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

Web Title : Pune Crime News | So-called rapist journalist from Solapur demands Rs 5 lakh extortion from businessman in Pune;
Crime branch police firing near Patas toll gate, Mahesh Hanme and Dinesh Hanme arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा