Pune Crime News | …म्हणून डॉक्टर्स डेच्या दिवशी पती डॉ. निखील अन् पत्नी डॉ. अंकिताची आत्महत्या, सुसाईड नोट सापडली

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन(Policenama Online) – Pune Crime | पुण्यात नवविवाहित तरुण डॉक्टर दाम्पत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरणात (In Pune, a newly married young doctor couple committed suicide by hanging themselves at their residence) आता केवळ एक पेशंट पाहण्यावरून वाद झाला आणि त्यातून डॉ. अंकिता हिने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचल्याचे वास्तव समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे पत्नी अंकिता हिचा विधी (सावडण्यास) करण्यास सकाळी जाण्याची तयारी करताना डॉ. निखिल कुटुंबाला फ्रेश होतो, असे म्हणून बाथरूममध्ये गेला व ओढणीने खिडकीला गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या दोघांच्या जाण्याने वानवडीसह त्यांच्या मित्र परिवारावर मोठा आघात झाला आहे. दरम्यान डॉ. निखिल आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. Pune Crime News | … So on Doctor’s Day, husband Dr. Nikhil Shendkar and his wife Dr. Ankita Shendkar’s do suicide, suicide note found

डॉ. निखिल दत्तात्रय शेंडकर (वय 28) Nikhil Dattatraya Shendkar व डॉ. अंकिता निखिल शेंडकर (वय 26) Ankita Nikhil Shendkar असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नावे आहेत. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात (wanowrie police station) आकस्मिक मृत्यूची (Accidental death) नोंद करण्यात आली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी (wanowrie) येथील आझादनगर भागात (Azadnagar Area) गल्ली नंबर दोन येथे एका फ्लॅटमध्ये डॉ. शेंडकर दाम्पत्य (Dr Shendkar Couple) राहत होते. निखिल यांचे आईवडील व पती-पत्नी राहत होते. निखिल यांचा डिसेंबर 2019 मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर इमारतीच्या खाली ते शेंडकर रुग्णालय चालवत होते.

मात्र, गेल्या तीन महिन्यापासून निखिल हे यवत-कासुर्डी (Yavat-Kasurdi) येथे रुग्णालय चालवत असत. बुधवारी निखिल Nikhil यांचा एक मानसिक रुग्ण त्यांना सतत फोन करत होता. पण ते रुग्णालयात नसल्याने त्यांनी डॉ. अंकिता Dr. Ankita याना फोन केला व तो पेंशट सतत फोनकरत असून, तू एकदा पाहून घे असे सांगितले. मात्र अंकिता यांनी त्याला नकार दिला आणि यावरूनच त्यांच्यात वाद झाला. वादातून अंकिता हिने राहत्या घरात बेडरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान सायंकाळी सव्वा पाच वाजता निखिल घरी आले. ते थेट बेडरूमकडे गेले. त्यावेळी आतून दरवाजा बंद होता. त्यांनी आवाज दिला. पण दरवाजा उघडत नसल्याने निखिल यांनी दरवाजा तोडला व आत आले. त्यावेळी पत्नी अंकिता हिने आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलीस व नातेवाईकांना माहिती दिली. तात्काळ वानवडी पोलीस व नातेवाईकांनी येथे धाव घेतली. त्यानंतर मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. अंकिता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या धक्यात शेंडकर कुटुंब व त्यांचे नातेवाईक होते.

 

दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी अंकिता हिचा विधी करण्यास जाण्यासाठी सर्वजण तयारी करत होते. यावेळी निखिल देखील सकाळी उठला आणि कुटुंबाला फ्रेश होतो, म्हणूम बाथरूममध्ये गेला. मात्र त्याने आत गेल्यानंतर दरवाजा लावून ओढणीच्या सह्याने खिडकीला गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार काही वेळात कुटुंबाला लक्षात आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील (deputy commissioner of police namrata patil) , पोलीस निरीक्षक दीपक लगड (Sr. Police Inspector Deepak Lagad) व त्यांच्या पथकाने धाव घेतली.

अंकिता या उरळी कांचन येथील होत्या.
तर त्यांचं शिक्षण पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात झाले आहे.
निखिलच शिक्षण जळगाव येथे झाले होते. त्या दोघांचं अ‍ॅरेंज मॅरेज झाले होते.
दोघे काही दिवस एकत्र रुग्णालय चालवत होते.
पण, तीनच महिन्यांपूर्वी निखिलने यवत येथील आसुर्डी येथे रुग्णालय सुरू केल होत.
याठिकाणी जाण्यासाठी त्यानं नुकतीच नवीन कार देखील केले होते.

 

सुसाईड नोट मिळाली…

डॉ. निखिल याने आज सकाळी आत्महत्या केली.
त्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिले आहे.
त्यात कोणालाही जबाबदार धरू नये,
असे लिहीत या सुसाईड नोटमध्ये अंकिता हिच्या नातेवाईकांची माफी मागितली आहे.

 

शेंडकर दाम्पत्याची कोरोना काळात सेवा…

निखिल दत्तात्रय शेंडकर Nikhil Dattatraya Shendkar व पत्नी अंकिता निखिल शेंडकर Ankita Nikhil Shendkar या दोघांनी कोरोना काळात अनेकांची मदत आणि सेवा केली होती.
त्यांनी रुग्णालयात आलेल्या प्रत्येकाला धीर देत कोरोनाबाबत माहिती देऊन त्यांची भिती घालवली होती.
त्यांच्यावर उपचार केले होते.
त्यामुळे शेंडकर यांच्या आत्महत्येने धक्का बसला आहे.

Web Titel :- Pune Crime News | … So on Doctor’s Day, husband Dr. Nikhil Shendkar and his wife Dr. Ankita Shendkar’s do suicide, suicide note found

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharera | महारेराचा मोठा निर्णय ! ‘त्या’ बिल्डरांना बसणार चाप

Covishield | ऑक्सफर्डचे नवे संशोधन ! ‘कोविशील्ड’चा तिसरा डोस घेतल्यास कोरोनापासून अधिक सुरक्षा

Pune News | पुण्यात भाजप नगरसेविकेच्या पती आणि भावाकडून रहिवाशाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल