Pune Crime News | …म्हणून 28 वर्षीय मुलाचा बापानेच गळा आवळुन केला खुन, हडपसरच्या काळेपडळमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मुलाच्या आजारपणाला कंटाळुन व त्याच्या औषधांचा खर्च परवडत नसल्याने बापानेच स्वतःच्या 28 वर्षीय मुलाचा गळा आवळुन खुन (Murder In Hadapsar Pune) केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या हडपसर परिसरातील काळेपडळ (Kalepadal) येथील केतकेश्वर कॉलनीमध्ये (Ketkeshwar Colony) गुरूवारी घडली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Police Crime Branch) बापाला ताब्यात घेवून त्यास हडपसर पोलिस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) ताब्यात दिले आहे. (Pune Crime News)

अभिजीत बाबुराव जायभाय (28) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याचा बाप बाबुराव दिनकर जायभाय (50) याला अटक केली आहे. यासंदर्भात सुनिता बाबुराव जायभाय (45) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी बाबुराव जायभाय यांचा मुलगा अभिजीत याला 6 महिन्यांपुर्वी डोक्याला मार लागला होता. त्याला काहीच काम करता येत नसल्यामुळे तो घरीच बेडवर झोपुन होता. घरीच अंथरूणावर खिळून असल्याने त्याची विष्टा काढणे, साफसफाई करणे ही कामे घरच्यांनाच करावी लागत होती. (Pune Crime News)

अभिजीतच्या आजारपणाला कंटाळुन व त्याच्या औषधांचा खर्च परवत नसल्याने वडिल बाबुराव जायभाय यांनी यापुर्वीही त्याला मारहाण करून मारण्याचा प्रयत्न केला होता.
अखेर गुरूवारी बाबुराव यांनी अभिजीतचा गळा आवळुन खून केला.
घटनेची माहिती मिळाली पोलिसांनी घटनास्थी धाव घेतली.
गुन्हे शाखेच्या युनिट-5 चे पोलिस निरीक्षक उल्हास कदम (PI Ulhas Kadam) यांनी बाबुराव जायभाय
यांच्याकडे चौकशी केली असता त्यानेच खुन केल्याचे निष्पन्न झाले.
त्याला हडपसर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. बाबुराव जायभाय हे हमाली काम करतात.
गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे (PI Vishwas Dagale) करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | …so the 28-year-old boy was strangled by his father, incident in Hadapsar’s Kalepadal Ketkeshwar Colony

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Devendra Fadnavis | डिजिटल तंत्रज्ञान सेवा पुरवठ्यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Political News | ‘फोडाफोडीचे राजकारण करण्यापेक्षा…’ काँग्रेसचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र