Pune Crime News | सोलापूरचे तोतया पत्रकार हनमे बंधूंनी बडया बिल्डरकडे देखील मागितली होती खंडणी; 50 लाख अन् 2 फ्लॅटची होती डिमांड, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सोलापूरचे तोतया पत्रकार (Fake Journalist From Solapur) महेश सौदागर हनमे Mahesh Saudagar Hanme (47) आणि दिनेश सौदागर हनमे Dinesh Saudagar Hanme (44, दोघे रा. राजेश्वरी नगर, ब्लॉक नं. 112, बाळे, उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) यांनी पुणे आणि सोलापूर स्थिती बिल्डरकडे (Builder In Pune) 50 लाख रूपये आणि 2 फ्लॅटच्या खंडणीची मागणी (Extortion Case) केली असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. याबाबत पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police) गुन्हे शाखेचा (Pune Police Crime Branch) तपास सुरू आहे. दरम्यान, तोतया पत्रकार हनमे बंधुंना (Hanme Brothers Arrested) शिवाजीनगर येथील न्यायालयात (Shivaji Nagar Court Pune) हजर करण्यात आले असता त्यांना दि. 23 मे 2023 पर्यंत पोलिस कोठडीत (PCR Till 23 May) सुनावण्यात आली आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, खराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीचे (Kharadi Software Companies) मालक संतोष पोपट थोरात Santosh Popat Thorat (रा. अल्कॉन सोसायटी, खराडी – Alcon Society Kharadi Pune) यांच्याकडे 5 कोटी रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तोतया पत्रकार हनमे बंधुंना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-2 ने Anti Extortion Cell Pune (AEC Pune) अटक केली आहे. त्यांना अटक करण्यासाठी पोलिस गेले असता हनमे बंधुंनी पोलिसांच्या अंगावार चारचाकी घालून त्यांना जीव ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केला होता. पोलिसांनी प्रसंगावधान राखून बचावासाठी त्यांच्या गाडीच्या मागील टायरच्या दिशेने गोळीबार (Firing Incident) देखील केला होता. त्यांना पाठलाग करून अटक करण्यात आले होते. (Pune Crime News)

हनमे बंधुंना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना दि. 23 मे 2023 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, हनमे बंधुंचे आणखी एक खंडणी प्रकरण उजेडात आले आहे. त्याबाबत गुन्हे शाखेचे पोलस सखोल तपास करीत आहेत. पुण्यातील भोसरीमध्ये (Builder In Bhosari) राहणार्‍या एका बिल्डरची कन्स्ट्रक्शन साईट सोलापूर (Builder In Solapur) येथे सुरू आहे. हनमे बंधुंनी त्या बिल्डरकडे देखील 50 लाख रूपये आणि 2 फ्लॅटच्या खंडणीची मागणी केली होती. याबाबत संबंधित बिल्डरने गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे संपर्क साधला असून पोलिस त्याबाबतचा तपास करीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हनमे बंधुंना पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर
(ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर
(Sr PI Pratap Mankar), सहाय्यक पोलिस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajgane),
पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव
(PSI Mohandas Jadhav), पोलिस अंमलदार विजय गुरव, पोलिस प्रदिप शितोळे, पोलिस विनोद साळुंके,
पोलिस संग्राम शिनगारे, पोलिस सुरेंद्र जगदाळे, पोलिस सैदोबा भोजराव, पोलिस सचिन अहिवळे,पोलिस अमोल पिलाने, पोलिस चेतन आपटे, पोलिस अनिल मेंगडे, पोलिस इश्वर आधंळे, पोलिस राहुल उत्तरकर, पोलिस पवन भोसले,
पोलिस चेतन शिरोळे, पोलिस प्रदिप गाडे, पोलिस किशोर बर्गे आणि पोलिस आशा कोळेकर यांच्या पथकाने अटक केली होती.

दरम्यान, हनमे बंधुंनी अशा प्रकारे आणखी कोणाला खंडणी मागितली असल्यास त्यांनी पुणे शहर पोलिसांच्या
गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Web Title :  Pune Crime News | Solapur’s fake journalist Hanme brothers also demanded ransom from Pune Builder; 50 lakhs and there was a demand for 2 flats, know the case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘तेढ निर्माण होईल असं काही बोलू नका’, काँग्रेसच्या बड्या नेत्यानं संजय राऊतांना सुनावलं

Sushma Andhare | ‘….तर आप्पासाहेब जाधव परत गेले असते का’, जाधव यांच्या दाव्यावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

Pune Railway Station News | पुणे रेल्वे स्थानकावर निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ व पाणी बॉटल विकणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाईचा दणका