Pune Crime News | आयान अन् आलियाच्या खुनाचे गुढ ‘गडद’च, पण सीसीटीव्हीत आबिद कैद; पोलिसांकडून युध्दपातळीवर तपास सुरू

पुणे (Pune Crime News) : पोलीसनामा ऑनलाइन – चिमुरड्याचा आणि त्याच्या आईचा खून (murder of son and mother) करून त्या दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी टाकल्याच्या प्रकरणात आता बेपत्ता असलेल्या महिलेच्या पतीवरच दाट संशय व्यक्त केला जात असून त्यानेच खून (Pune Crime News) केला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. महिलेचा सासवड (Saswad) व मुलाचा कात्रज बोगदा येथे मृतदेह आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. तत्पूर्वी मार्केटयार्ड परिसरात मिळालेली ब्रिझा कारची पाहणी केल्यानंतर त्यात लहान मुलाची चप्पल, खाण्याच्या वस्तू व रक्ताचे डाग आढळून आले आहेत. पती कार लावून पायी चालत जात असताना एका सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आयान आबिद शेख (वय 7) Ayan abid shaikh आणि आलिया आबिद शेख (वय 35) Aliaya abid shaikh अशी खून झालेल्या माय-लेकाची नावे आहेत. याप्रकरणी सासवड (Saswad) आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात bharti vidyapeeth police station गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सासवड येथील खळद भागात एका महिलेचा मृतदेह आढळला. तर सायंकाळी चिमुकल्याचा मृतदेह कात्रज बोगदा दरी पुलाजवळ आढळून आला होता. यानंतर हे दोघे मायलेक असल्याचे समोर आले. पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. त्या दोघांचा खून करून मृतदेह फेकुन देण्यात आल्याचे आल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्याचवेळी त्यांची कार सातारा रस्त्यावर असलेल्या एका चित्रपट गृहजवळ आढळली. रात्रभर पोलीस या घटनेचा तपास करत होते. यावेळी महिलेचा पती आबिद शेख abid shaikh हा बेपत्ता असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांकडून कसुन शोध सुरू झाला. या दरम्यान बेपत्ता असलेल्या महिलेचा पती आबिद शेख abid shaikh याने (दि. 11 जून) रोजी ही कार भाड्याने घेतली होती. ही कार घेऊन तो आलिया आणि आयान यांच्यासह पिकनिकला गेला होता. यावेळी सोमवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास आबिद शेख abid shaikh सातारा रस्त्यावरील एका दुकानासमोर गाडी पार्क करून पायी चालत निघून गेला आल्याचे सीसीटीव्हीमधून समोर आले आहे.

 

शेख कुटुंब दिवसभर फिरले…

तिघेजण धानोरी येथून सकाळी गाडी घेऊन बाहेर फिरण्यास पडल्यानंतर ते दिवे घाटमार्गे सासवडला गेले. यानंतर ते नारायणपूर आणि केतकावळे येथील बालाजी टेम्पल आणि परत दिवे घाटात आले. परत पुन्हा सासवड याठिकाणी गेले. तेथून सासवडकडून परत कात्रज घाट येथे आले. त्यानंतर जुना बोगदा आणि नवीन बोगदा मार्गे सातारा रस्त्यावर कार आली असल्याचे समोर आहे. जी ब्रिझा कार रेंटवर घेण्यात आली होती ती व्यवसायिक कंपनीची कार होती. त्या कारला जीपीएस सिस्टीम बसवलेली होते.. त्यातून हा प्रकार समोर आला आहे.

शेख कुटुंब भोपाळचे…
शेख कुटुंबिय मूळचे भोपाळ येथील आहे. पुण्याच्या धानोरी परिसरात ते राहत होते. आबिद शेख हा एका नामांकित कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता. तर पत्नी आलिया ही देखील उच्चशिक्षित असून काही दिवस नोकरी केली आहे. मात्र यानंतर तिने नोकरी सोडली होती, अशी माहिती मिळाली आहे.

कारमध्ये रक्ताने माखलेला सॅन्डल आढळले
शेख यांनी भाड्याने घेतलेली ब्रिझा सातारा रस्त्यावर सापडली.
पोलिसांनी पाहणी केली असता कारच्या दरवाज्यावर रक्ताचे सडे आहेत.
तर कारमध्ये रक्ताळलेला लहान मुलांच्या सॅन्डल सापडला आहे.
शिवाय खाण्याच्या वस्तू, फळे विखुरलेली आढळली आहेत.
त्यामुळे ही सर्व परिस्थिती पाहून कारमध्ये खून झाला असावा अशी शक्यता आहे.
आज पुणे पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमने सकाळी गाडीची तपासणी करून रक्ताचे नमुने हस्तगत केले आहेत.
पुणे पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Wab Title :- pune crime news | son ayan and mother Aliaya brutally murdered, abid catch in cctv, police investigating case

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये