pune crime news | आयान अन् आलियाचा खून आबिदनं केल्याचा पोलिसांना संशय, कारण देखील आलं समोर; जाणून घ्या संपुर्ण प्रकरण

पुणे (pune crime news) : पोलीसनामा ऑनलाइन – चिमुरड्या आयान अन् पत्नी आलिया यांचा खून करून आबिद याने खानापूर (Khanapur) येथे जाऊन आत्महत्या (Suicide) केल्याचे समोर आले आहे. 2 दिवस बेपत्ता (Disappeared) झालेल्या आबिद याचा आज सकाळी मृतदेह दिसून आला आणि मायलेकाच्या खून (murder) प्रकरणाचे गूढ उघड झाले आहे, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी (Senior Police Officer) घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिस्थिती पाहता आबिद याने खून केला आणि आत्महत्या केल्याचे दिसून आले आहे, असे परिमंडळ दोनचे उपायुक्त सागर पाटील (Sagar Patil) यांनी सांगितले आहे. खून कौटुंबिक कारणावरून झाला अशी दाट शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. pune crime news | son ayan shaikh and mother Aliaya shaikh brutally murdered, abid shaikh suicide, pune police investigating case

आबिद अब्दुल शेख (Abid Abdul Sheikh) (वय 38) असे या घटनेनंतर बेपत्ता झालेला आणि मृतदेह मिळालेल्या पतीचे नाव आहे. तर मंगळवारी आयान आबिद शेख (Ayan Abid Sheikh) (वय 7) व आलीय आबिद शेख (Aliya Abid Sheikh) (वय 35) या माय-लेकाचा खुन झाल्याचे उघडकीस आले होते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

पोलिसांच्या माहितीनुसार, खडकवासला बॅक वॉटरचे पाणी खानापूर भागात येते. त्याठिकाणी आज सकाळी काही मच्छीमार गेले होते. त्यांना मृतदेह तरंगत असताना दिसून आला. त्यांनी हा प्रकार हवेली पोलिसांना (Haveli Police) सांगितला. त्यानंतर हवेली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी करत असताना तो मृतदेह आबिद याचा असल्याचे स्पष्ट होताच त्यांनी ही माहिती पुणे पोलिसांना (Pune Police) दिली. यानंतर परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त सागर पाटील, गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे (Crime Branch Deputy Commissioner Srinivas Ghadge) व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे (Bharati Vidyapeeth Police Station) पोलीस निरीक्षक कळसकर (Police Inspector Kalaskar) व पथकाने येथे धाव घेतली व पाहणी केली. घटनास्थळी आबिद याची बॅग मिळाली असून त्यात आधार कार्ड व इतर कागदपत्रे मिळाली आहेत.

खून व आत्महत्येच कारण कौटुंबिक
आबिद व आलिया यांना आयान हा एकच मुलगा होता. मात्र तो गतिमंद होता. यावरून त्यांच्यात वाद होते. 2011 सालीचे शेख कुटुंब पुण्यात नोकरी निमित्त आले होते. मात्र त्यांचे मुलावरून वाद होत असत. यावरून हे खून आणि आत्महत्या प्रकरण घडले असण्याची शक्यता आहे, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासावरून दिसत आहे. नातेवाईक व परिसरात केलेल्या चौकशीत त्यांचे वाद असत, असे समजले आहे.

आबिद याने पत्नी व मुलगा आयान याचा खून केला. पण यानंतर त्याला अपराधी पणाची भावना झाली असावी व त्यातून त्याने आत्महत्या केली असल्याची शक्यता आहे. त्याचे मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतर कळेल असेल असे सांगण्यात आले आहे.

शहरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यातील अनेक सीसीटीव्हीत तो कैद झाला आहे. तो एकटाच दिसत आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे, असे म्हणता येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

तीन पोलीस करणार तपास.
आलिया हिचा मृतदेह सासवड (saswad) हद्दीत घडला. त्यानुसार सासवड पोलिसांनी खुनाचा गुन्हा (FIR) दाखल केला. त्याचा तपास सासवड पोलीस (Saswad police) करत आहेत. तर आयान याचा मृतदेह कात्रज (Katraj) येथे मिळाला. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत. तर आता आबिद याचा मृतदेह खानापूर भागात सापडला. त्यानुसार हवेली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याचा तपास हवेली पोलीस करत आहेत.

पहिली घटना उघड आणि प्रकरणाला सुरुवात…
मंगळवारी सकाळी सासवड येथील खळद भागात एका महिलेचा मृतदेह आढळला.
तर सायंकाळी चिमुकल्याचा मृतदेह कात्रज बोगदा दरी पुलाजवळ आढळून आला होता.
यानंतर हे दोघे मायलेक असल्याचे समोर आले. पोलिसांनी शोधाशोध सुरू केली.
त्या दोघांचा खूनकरून मृतदेह टाकण्यात आल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
त्याचवेळी त्यांची कार सातारा रस्त्यावर असलेल्या एका चित्रपट गृहजवळ आढळली.
रात्रभर पोलीस या घटनेचा तपास करत होते.
यावेळी महिलेचा पती आबिद शेख हा बेपत्ता असल्याचे समोर आले.
त्यानंतर पोलिसांकडून कसुन शोध सुरू झाला.
यादरम्यान बेपत्ता असलेल्या महिलेचा पती आबिद शेख याने (दि. 11 जून) रोजी ही कार भाड्याने घेतली होती.
ही कार घेऊन तो आलिया आणि आयान यांच्यासह पिकनिकला गेला होता.
यावेळी सोमवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास आबीद सातारा रस्त्यावरील एका दुकानासमोर गाडी पार्क करून पायी चालत निघून गेला आल्याचे सीसीटीव्हीमधून समोर आले होते.

त्या दिवशी दिवसभर फिरले…
तिघेजण धानोरी येथून सकाळी गाडी घेऊन बाहेर फिरण्यास पडले.
ते दिवे घाटमार्गे सासवडला गेले. यानंतर ते नारायण पूर आणि केतकावले येथील बालाजी टेम्पल गेले.
परत दिवे घाटात आले. पुन्हा सासवड याठिकाणी गेले.
तेथून सासवडकडून रिटन कात्रज घाट येथे आले.
त्यानंतर जुना बोगदा आणि नवीन बोगदा मार्गे सातारा रस्त्यावर कार आली असल्याचे समोर आहे.

शेख कुटुंबिय मूळचे भोपाळ येथील बैतुल गावचा होता.…

Web Titel :- pune crime news | son ayan shaikh and mother Aliaya shaikh brutally murdered, abid shaikh suicide, pune police investigating case

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi | लोकप्रियतेत पीएम नरेंद्र मोदीच सर्वोत्कृष्ट नेते; जो बायडन यांच्यासह 13 जागतिक नेत्यांना टाकलं मागे

धक्कादायक ! गुजरातच्या साबरमती नदीत सापडला कोविड-19 व्हायरस, तपासणीत सर्व नमुने आढळले संक्रमित