Pune Crime News | पुण्यात जावायाचा सासूवर हल्ला, लोहियानगर परिसरातील घटना

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन  (Policenama Online) –  पुण्यात जावयाने सासुवर हल्ला केल्याची घटना घडली असून (Pune Crime News), ‘पत्नीचा माहेरी सांभाळ का करतेस’ असे म्हणत लोखंडी पाईपने मारहाण (Beating) केली आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडला आहे. Pune Crime News : son in law attack on mother in law in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

सलमान नासिर शेख (वय 24), आफरिदी उर्फ बुढा (वय 30 अंदाजे) आणि सलमान उर्फ छन अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी अब्दुल्ला बाबु खलील खान (वय 43) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा आरोपी सलमान शेख हा जावई आहे.
दरम्यान पत्नी महवरी येत असत. रविवारी देखील ती माहेरी आली होती.
यावेळी रविवारी रात्री सलमान शेख फिर्यादी यांच्या लोहियानगर (Lohianagar) येथील घरी आला.
त्यांने फिर्यादी यांच्या पत्नीला उद्देशून”माझी पत्नी माहेरी आल्यानंतर तू तिचा सांभाळ का करतेस” आज मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत फिर्यादी यांना हातातील लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली.
या गोंधळानंतर फिर्यादी व त्यांची पत्नी हे पोलिसात तक्रार देण्यासाठी लोहियानगर पोलीस चौकी येथे जात होते. त्यावेळी आज तुम्हाला जिवंत सोडणार नाही.
ही असे म्हणून फिर्यादी व त्यांच्या पत्नी यांना पुन्हा लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.
अधिक तपास खडक पोलीस (Khadak Police Station) करत आहेत.

Web Title : Pune Crime News | son in law attack on mother in law incident in Lohianagar area of pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Shirur News | म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शन साठी 60 हजारांची फसवणूक; शिरुर तालुक्यातील पाबळ येथील घटना