Pune Crime News | विश्रामबाग परिसरातील जुगार अड्डयावर गुन्हे शाखेच्या ‘सासु’चा छापा

0
254
Pune Crime News | SS Cell of the Pune Police Crime Branch raided a gambling den in Vishrambaig area
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | विश्रामबाग परिसरातील एका बंद खोलीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell Pune) छापा टाकून 12 जणांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 1 लाख 24 हजार 870 रूपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune Crime News)

 

विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या (Vishrambaug Police Station) हद्दीत एका बंद खोलीमध्ये काहीजण पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर संबंधित ठिकाणावर गोपनियरित्या पाळत ठेवण्यात आली आहे. रविवारी सामाजिक सुरखा विभागाने जुगार अड्डयावर छापा टाकला. त्यावेळी तेथे 10 जण पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून रोख 24 हजार 870 रूपये आणि 8 मोबाईल संच असा एकुण 1 लाख 24 हजार 870 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव (PI Bharat Jadhav), सहाय्यक निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), पोलिस अंमलदार अजय राणे, अण्णा माने, तुषार भिवरकर, संदिप कोळगे यांच्या पथकाने जुगार अड्डयावर छापा टाकून कारवाई केली आहे.

 

Web Title :- Pune Crime News | SS Cell of the Pune Police Crime Branch raided a
gambling den in Vishrambaig area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा