Pune Crime News | पुणे-नाशिक महामार्गावर एसटी चालकास मारहाण अन् महिला कंडक्टरला नेलं फरफटत

राजगुरुनगर: पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मला साईड का दिली नाही, म्हणूून एसटी चालकाला (ST driver) मारहाण करून महिला वाहकाला कारच्या बोनटवर100 फुटापर्यत फरफटत नेल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातूनव ( Pune district ) समोर आली आहे. खेड तालुक्यात पुणे -नाशिक महामार्गावर तुकाईभांबुरवाडी (Tukai Bhamburwadi) येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चालकाविरूध्द सरकारी कामात अडथळा, तसेच मारहाण, शिविगाळ, करून एस.टी बसची काच फोडल्याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा (FIR ) दाखल करण्यात आला आहे.pune crime news | st driver beaten on pune nashik highway

याबाबत एसटी बस चालक सदु किसन भालेराव (वय.43 धंदा.नोकरी रा.खेड) याने खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजगुरुनगर आगाराची बस पुणे -नाशिक महामार्गावरून मंचर दिशेने जात होती. दरम्यान बसला मागून ओव्हर टेक करणाऱ्या कारचालकाने कार बससमोर आणून आ़डवी उभी केली. कारमधून लाकडी काठी काढून एसटीची समोरील काच फोडली. तसेच चालकाला मारहाण केली. त्यावेळी महिला वाहक सारिका चिंचपुरे यांनी त्या कार चालकास आम्ही आॅन डयुटी आहोत, तुम्ही असे करू नका असे सांगितले.

मात्र कार चालकाने मला साईड का दिली नाही, मला एक मर्डर करण्याचा आधिकार आहे. मी तुम्हाला बघून घेतो, मी कोण आहे हे तुम्हाला दाखवितो, असे म्हणून निघून जात होता. दरम्यान वाहक चिंचपुरे यांनी आमचे आधिकारी येईपर्यंत कार चालकास थांबण्याची विनंती केली. परंतु तो न थांबता निघून जात होता. त्यामुळे वाहक चिंचपुरे यांनी कारचा समोरील एक वायपर धरल्यावर त्याने कार थांबवली नाही. चिंचपुरे यांना जवळपास 100 फुटापर्यंत परफटत नेले. त्यावेळी रस्त्याने जाणारे दुस-या गाडीवरील लोक मोठयाने ओरडल्याने त्याने कार थांबवली. वाहक चिंचपुरे खाली उतरल्यानंतर तो तिथुन पुढे मंचरच्या बाजूने पळ काढला. खेड पोलीस फरार कारचालकाचा शोध घेत आहेत.

Web Titel : pune crime news | st driver beaten on pune nashik highway

हे देखील वाचा

COVID-19 vaccine tips | सर्दी, खोकला, तापासारख्या कोरोनाच्या लक्षणांनी पीडित लोक लस घेऊ शकतात का?

सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीशी अनिल देशमुखांचा थेट संबंध नाही; उच्च न्यायालयात युक्तिवाद

Panchavati Express | खूशखबर ! मुंबई- नाशिक धावणारी ‘पंचवटी’ अन् ‘जनशताब्दी’ एक्स्प्रेस उद्यापासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत

Bank Holidays in July 2021 । जुलैमध्ये एकूण 15 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्टयांची यादी