Pune Crime News | खळबळजनक ! पुण्यात 22 वर्षीय तरूणीच्या नाका-तोंडात गांजाचा धूर सोडून लैंगिक अत्याचार, कोंढव्यात श्रवण अंकुशेविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | 22 वर्षीय तरूणीकडे शरीर सुखाची (Physical Relation) मागणी केल्यानंतर त्यास तिने नकार दिल्याने नराधमाने तिचे हात-पाय कपडयाने बांधुन गांजा (Ganja) ओढुन त्याचा धुर तिच्या नाका-तोंडात सोडुन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Crime Against Woman) केले. ही घटना दि. 17 मार्च रोजी घडली असून याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) एकाविरूध्द बलात्काराचा (Rape In Pune) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

श्रवण राजेंद्र अंकुशे Shravan Rajendra Ankushe (रा. उंड्री – Undri, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी 22 वर्षाच्या पिडीत तरूणीने पोलिसांकडे (Pune Police) फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी आणि पिडीत तरूणी यांच्या आरोपीचे दुसर्‍या मुलीसोबत अफेअर
(Affair With Another Girl) असल्याच्या संशयावरून तसेच पुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातुन दि. 17 मार्च रोजी भांडण झाले. आरोपीने घराचा दरवाजा लावुन पिडीत तरूणीकडे शरीर सुखाची मागणी केली. त्यास तरूणीने स्पष्ट नकार दिला. त्यानंतर आरोपी श्रवण अंकुशे याने पिडीत तरूणीचे हात कपडयाने बांधून गांजा ओढुन त्याचा धूर तिच्या नाका-तोंडात सोडला. तिच्या डोक्यात आणि पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गांजाचा धूर नाकात गेल्याने पिडीत तरूणीला गुंगी आली. त्यानंतर आरोपी अंकशेने तिच्या इच्छेविरूध्द बलात्कार केला. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक तोरगल करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Stirring ! 22-year-old girl assaulted by leaving marijuana Ganja dust in her nose and mouth in kondhwa Pune rape case crime

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

FIR On NCP Sachin Dodke | राष्ट्रवादीच्या सचिन दोडकेंविरूध्द गुन्हा दाखल; भाजप सरचिटणीसाला धमकावून कामगारांना केली मारहाण

Pune Crime News | पुण्यात दोन कारवायात 11 लाखांचे अमली पदार्थ जप्त; कॅथा इडुलिस खत, ड्रग्ज प्रथमच पकडले, दोन परदेशी नागरिकांना अटक

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर, अखेर ‘ते’ अनधिकृत बांधकाम हटवले

Pune Crime News | रूम भाड्याने देताय सावधान; डिपॉझिट पाठविण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक