Pune Crime News | मावस भावाला सत्तूरचा धाक दाखवून गल्ल्यातील रोकड चोरली; घोरपडे पेठेतील घटना

पुणे : Pune Crime News | दुकानात असलेल्या मावस भावाला सत्तूरचा धाक दाखवून शिवीगाळ करुन गल्ल्यातील १५ हजार रुपये जबरदस्तीने चोरुन नेण्यात आले. (Pune Crime News)
याबाबत सोहेल नईम शेख (वय २५, रा. भिमपूरा, कॅम्प) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३१७/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शार्जील ऊर्फ शाला लतीफ शेख Sharjeel alias Shala Latif Shaikh (वय ३०) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार घोरपडे पेठेतील खेडेकर भाजी मार्केटजवळील गुडलक मटण शॉपमध्ये रविवारी सकाळी साडेअकरा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शार्जील हा फिर्यादी यांचा मावस भाऊ आहे. त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. फिर्यादी हे दुकानात असताना शार्जील तेथे आला. त्याने सत्तूरचा धाक दाखवून जबरदस्तीने गल्ल्यातील १५ हजार रुपये घेऊन तो निघून गेला. सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे (Assistant Police Inspector Sonwane) तपास करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Sadabhau Khot | ‘राष्ट्रवादीचे वळू बैल शेतकऱ्यांच्या बांधावर सोडू नका अन्यथा…’ – सदाभाऊ खोत
मुंढवा: लग्न जमले असताना शारीरीक संबंध ठेवून नंतर दिला लग्नास नकार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
Pune News | पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्ष पदी राज मुजावर यांची नियुक्ती