Pune Crime News | चोरीला गेलेले दागिने महिलेला केले परत, कोंढवा पोलिसांची कामगिरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | आपली एखादी लहान वस्तू हरवली किंवा चोरीला गेली तर किती दु:ख होतं. मग कष्ट करुन पै-पै जमून तयार केलेले दागिने (Gold Jewellery) जर चोरीला (Pune Crime News) गेले तर त्याची काय अवस्था होईल? पुण्यातील महंमदवाडी परिसरातील एक कुटुंब नाताळ सणानिमित्त (Christmas) चर्चमध्ये रात्री प्रार्थना करण्यासाठी गेल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घरातून तब्बल 22 लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लेडीज घड्याळ चोरून (Stolen) नेले होते. पोलिसांनी (Pune Police) गुन्हेगाराला अटक (Arrest) करुन गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करुन सोन्याचे दागिने तक्रारदार महिलेला परत मिळवून (Police Returned Jewellery) दिले. त्यामुळे त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

 

महंमदवाडी परिसरात राहणाऱ्या बबिता शेरॉन डिसोझा (Babita Sharon D’Souza) यांनी याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली होती. याप्रकरणी मल्लपा महादेव होसमानी (वय-31 रा. कात्रज, पुणे) याला गुन्हे शाखा युनिट 5 (Crime Branch Unit 5) चे सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर (API Krishna Babar) आणि त्यांच्या टीमने अटक केली आहे. (Pune Crime News)

 

फिर्यादी बबिता डिसोझा या नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी गेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या घरातील खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. बेडरुममधील लोखंडी तिजोरीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व लेडीज घड्याळ (Ladies Watch) असा एकूण 22 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास युनिट पाचच्या पथकाने करुन आरोपीला अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला होता.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Senior Police Inspector Santosh Sonwane)
यांनी फिर्य़ादी बबिता डिसोझा यांना चोरीला गेलेले सोन्याचे दागिने शनिवारी (दि.4) परत केले.
यावेळी पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले (Police Inspector Sanjay Mogle) उपस्थित होते.
पुणे पोलिसांच्या या कामगिरीमुळे दागिने परत मिळाल्याने
बबिता डिसोझा यांच्या चेहरऱ्यावरील आनंद गगनात मावेना गेला होता.

 

Web Title :- Pune Crime News | Stolen jewelery returned to woman, performance of Kondhwa police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा