Pune Crime News | कोयत्याचं लोण शाळेपर्यंत, एका विद्यार्थ्यावर कोयत्याने वार, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोयता गँगने (Pune Koyta Gang) दहशत पसरवली आहे. हा प्रकार शहराच्या मध्यवर्ती भागात सर्रास सुरु आहे. आता या कोयत्याचे लोण शाळांमध्ये पोहचल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पुण्यातील नुतन मराठी विद्यालय Nutan Marathi Vidyalaya Pune (नुमवि – NMV Pune) मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला (Student Attack) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत (Pune Crime News) 17 वर्षाचा विद्यार्थी जखमी झाला असून त्याच्यावर दोन अल्पवयीन मुलांनी हल्ला केला.

 

साउथ चित्रपटांमध्ये (South Movies) एकमेकांच्या अंगावर धावून जात कोयत्याने मारहाण केल्याचे दाखवले जाते. तशाच पद्धतीने पुण्यात कोयता गँग दहशत पसरवत आहे. आता तर थेट शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी (Pune Police) काल याच शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना समुपदेशन (Counselling) केले होते. (Pune Crime)

समीर पठाण (Sameer Pathan) आणि विजय आरडे (Vijay Arde) अशी या 17 वर्षीय विद्यार्थ्यांची नावे आहेत.
विजय आरडे हा बारावीत शिकत असून तो पद्मावती परिसरात राहतो. तर समीर पठाण हा तुळशीबागेत (Tulshibaug) काम करतो.
पठाण याच्या मैत्रिणीसोबत विजय बसस्टॉपवर बोलत होता. आपल्या मैत्रिणीसोबत बोलत असल्याचा राग त्याला आला आणि त्याने विजयवर कोयत्याने वार केला.
या हल्ल्यात शेजारी असलेला विद्यार्थी देखील जखमी झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.
त्यावेळी जवळ असलेल्या वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) जखमी विजयला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

 

Web Title :- Pune Crime News | student was attacked by a coyote in a school in pune the student s hand was seriously injured

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bachchu Kadu | ‘शिंदे गटाच्या उठावामुळे राज्यात राजकीय अस्थिरता;’ आमदार बच्चू कडूंचा शिंदे गटाला घरचा आहेर

Pune Crime News | जेवण न देता दारु पिलेल्या दुसर्‍या पत्नीचा लाथाबुक्क्यांनी केला खून; रिक्षाचालकाला अटक

Mumbai Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू