Pune Crime News | असे पैसे मी रात्रीला खर्च करतो; पतीचे पैसे घेण्यास गेलेल्या महिलेचा कंपनी संचालकाकडून विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | पतीने केलेल्या कामाचे पैसे घेण्यासाठी गेलेल्या महिलेला तुला किती पैसे पाहिजे सांग, साली तुझ्या सारख्या बाया आहेत माझ्याकडे असे पैसे मी रात्रीला खर्च करतो, असे म्हणून कंपनीच्या संचालकाने (Company Director) विनयभंग (Molestation) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत एका ३१ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २०३/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फ्युचर टेक कंपनीचे (Future Tech Company) संचालक अमेय धनंजय गुर्जर (Amey Dhananjay Gurjar) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोथरुडमधील मयुर कॉलनीमधील फ्युचर टेक कंपनीत सोमवारी दुपारी दोन वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीने कंपनीत काम केले.
त्या कामाचे पैसे घेण्यासाठी फिर्यादी पतीसह फ्युचर टेक कंपनीत गेल्या होत्या.
त्यावेळी कंपनीचे संचालक अमेय गुर्जर यांनी फिर्यादी यांना “ए बाई तुझ्या तोंडाला कोण लागत नाही.
तुला किती पैसे पाहिजे सांग, तुझ्या नवर्‍याने तुला पुढं केलंय ना. किती पैसे पाहिजे सांग. साली तुझ्या सारख्या बाया आहेत माझ्याकडे, असे पैसे मी रात्रीला खर्च करतो, असे म्हणून अश्लिल शिवीगाळ केली. फिर्यादीच्या हाताला धरुन ऑफिस बाहेर ओढत नेऊन फिर्यादीच्या मनास लज्जा निर्माण केली. तसेच फिर्यादीचे उजवे हातातील बांगडी फुटून हाताला दुखापत झाली आहे. आरोपीने धक्का दिल्याने फिर्यादी दरवाजाचे कडीवर जाऊन आदळल्याने फिर्यादीचे उजवे हाताला पोटरीजवळ दुखापत झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक काटकर (PSI Katkar) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Blood Sugar वाढल्याने किडनी फेल होण्याचा धोका! स्वत:ची ‘या’ ५ प्रकारे घ्या काळजी