Pune Crime News | पुण्यातील डेक्कन परिसरात इंजिनिअरची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime News | एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या मुंबई येथील आयटी इंजिनिअरने (IT Engineer ) पुण्यातील डेक्कन परिसरात राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली आहे. पण या आत्महत्येचे कारण स्पष्ट नसून, त्याबाबत चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला आहे. Pune Crime News | Suicide by hanging at the residence of an engineer in the Deccan area of Pune

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

अक्षय सुधीर देवधर (वय 36, रत्नाली अपार्टमेंट, बीएमसीसी रस्ता, डेक्कन) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी डेक्कन पोलीस (Deccan Police) ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय मुंबई येथील आहे.
त्याचे आई-वडिल मुंबईला राहतात. तर अक्षय हा येथील आजोबांच्या घरी राहत होता.
तो एकटाच राहत होता. तो जर्मनी येथील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करत होता.
पुण्यातून तो वर्कफ्रॉम काम करत होता.

दरम्यान, गुरुवारी अक्षयला त्याचे कुटुंबीय फोन करत होते. पण, तो फोनला प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे त्याचे नातेवाईक फ्लॅटवर आले.
तर फ्लॅट बंद होता. त्यांनी आवाज देऊन दार वाजवले. मात्र तो दार उघडत नसल्याने त्यांनी डेक्कन पोलिसांना माहिती दिली. अग्निशामक दलाच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
त्यावेळी अक्षयने गळफास घेतल्याचे आढळून आले आहे. अक्षयच्या मृत्युचे कारण मात्र अस्पष्ट आहे. त्याबाबत पोलीस माहिती घेत आहेत.
आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट (Suicide note) लिहून ठेवली नाही.
पण, डायरीत “या जीवनाला अर्थ नाही” असे लिहिल्याचे आढळले आहे. अक्षयला गिर्यारोहणाची आवड होती.

Web Title : Pune Crime News | Suicide by hanging at the residence of an engineer in the Deccan area of Pune

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Share Market । कमाई करण्याची संधी ! याठिकाणी पैसे गुंतवून केल्यास मिळणार डबल रिटर्न, तज्ज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला

Aamir Khan | ‘अकेले हम अकेले तुम’ अमिर खानच्या भावाचाही झाला घटस्फोट, पत्नीने केले ‘हे’ गंभीर आरोप

‘अमजद खान’ नावाने भाजपचे खासदार नाना पटोले यांचा फोन केला जात होता ‘टॅप’; अजित पवार म्हणाले – ‘आरोपात ‘दम’ आहे’