Pune Crime News | पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या, पुण्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पोलीस भरतीची (Police Recruitment) तयारी करणाऱ्या एका 25 वर्षाच्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide Case) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यातील उरूळी कांचन परिसरात घडली असून तरुणीच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. (Pune Crime News)

सोनाली धनाजी धुमाळ Sonali Dhanaji Dhumal (वय-25 रा. टिळेकर मळा, उरुळी कांचन, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली धुमाळ ही विवाहित असून तिचा घटस्फोट (Divorce) झाला आहे.
ती उरुळी कांचन परिसरात माहेरी राहत होती. मागील एक वर्षापासून ती पोलीस भरतीची तयारी करीत होती.
आई-वडील बाहेर गेल्यानंतर सोनाली हिने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोनाली हिने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cyber Crime News | सायबर चोराचं ऐकून अ‍ॅप डाऊनलोड, पुण्यातील महिलेला 4 लाखांचा गंडा

Pune Crime News | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक, मुंबईतील बाफना मोटर्सच्या संचालकावर FIR

ACB Trap Case News | शेतीची खाते फोड करुन देणारा खाजगी पंटर अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Pimpri Chinchwad Police News | ‘देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़कर’ ! पोलिस उपनिरीक्षकाला मिळाले कोटयावधी, जाणून घ्या नेमकं काय झालं