Pune Crime News | पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; मुंढवा येथील खळबळजनक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मुंढवा येथील केशवनगर (Keshav Nagar, Mundhwa) परिसरात राहणार्‍या एकाच कुटुंबातील चौघांनी विषप्राशन करुन आत्महत्या (Family Suicide In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री उघडकीस आला. (Pune Crime News)

दीपक  थोटे (वय ५९), इंदू दीपक थोटे (वय ४५), मुलगा ऋषिकेश दीपक थोटे (वय २४) आणि मुलगी समीक्षा (वय १७, सर्व रा. अंकुर कॉम्प्लेक्स, केशवनगर, मुंढवा) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दीपक थोटे मुळचे अमरावती येथील राहणारे आहेत. त्यांचा मुलगा ऋषिकेश थोटे हा शेअर व्यवसायिक आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ते पुण्यात रहायला आले होते. त्यामुळे त्यांची फारशी कोणाला माहिती नाही. हे कुटुंबीय अंकुर कॉम्प्लेक्समध्ये तिसर्‍या मजल्यावर रहात होते.

त्यांच्या शेजारी राहणार्‍यांना थोटे दरवाजा उघडत नसल्याचे लक्षात आले. त्यांनी दरवाजा वारंवार वाजविल्यावर दरवाज्याची कडी सरकल्याचा आवाज आला. त्यांनी दरवाजा उघडला.
त्यावेळी त्यांना हॉल व किचनमध्ये कोणीही आढळून आले नाही.
त्यांनी आतमधील बेडरुमच्या दरवाजातून आत पाहिल्यावर एका बाजूला तिघे जण व पायथ्याशी एक असे चार जण झोपलेले आढळून आले.
त्यांनी तेथील एका डॉक्टरांना बोलावले. त्यांनी येऊन पाहिले
असताना चौघांचा मृत्यु झाल्याचे दिसून आले.
त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. (Pune Crime News)

पोलिसांनी (Mundhwa Police Station) घरात तपासणी केली असता त्यांना रात्रीचे जेवण दोन भाज्या व चपात्या असे साहित्य आढळून आले. या व्यतिरिक्त घरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
पोलिसांनी चौघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविले आहेत.
आर्थिक कारणावरुन त्यांनी विषप्राशन करुन आत्महत्या केल्याचा
पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title :- Pune Crime News | Suicide of four from the same family in Pune;
Sensational incident at Keshav Nagar Mundhwa Pune Crime News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BMC Commissioner Iqbal Singh Chahal | ठाकरेंचे विश्वासू अधिकारी ईडीच्या रडारवर, BMC आयुक्त चहल यांना 100 कोटींच्या घोटाळाप्रकरणी ईडीची नोटीस

Bombay High Court | मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी आनंद परांजपेंना हायकोर्टाचा दिलासा, पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

Chandrashekhar Bawankule | ‘…त्यामुळेच ते दुसऱ्यांवर टीका करतात’; चंद्रशेखर बावनकुळेंची काँग्रेसवर टीका