Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : स्वारगेट पोलिस स्टेशन – महर्षीनगरमध्ये पुर्ववैमनस्यातून दोघांवर कोयत्याने सपासप वार, चौघांविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनाम ऑलनाइन – Pune Crime News | पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवुन चौघांनी मिळुन दोघांवर कोयत्याने सपासप वार (Attempt To Kill) केल्याची घटना महर्षीनगरमधील (Maharshi Nagar) राधाकृष्ण मंदिराजवळ घडली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये (Swargate Police Station) चौघांविरूध्द गुन्हा First Information Report (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

दादा मोरे (Dada More Maharshinagar), सार्थक शिंदे Sarthak Shinde Maharshinagar (दोघे रा. दुर्गा माता मंदिराजवळ, महर्षीनगर, पुणे), अनिकेत खाडे (Aniket Khade Maharshinagar) आणि सिध्दार्थ (दोघे रा. व्हेईकल डेपो, गुलटेकडी, पुणे) यांच्याविरूध्द सीआर नंबर 134/2023 प्रमाणे भादंवि कलम 324, 323, 504, 34 आर्मअ‍ॅक्ट 4 (25) सह म.पो. अधि. कलम 37(1)/135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मंदार बाळु गायकवाड Mandar Balu Gaikwad (35, रा. 12/96, महर्षीनगर, राधाकृष्ण मंदिराजवळ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, मंदार गायकवाड हे त्यांच्या मित्रासोबत मोबाईलवर आयपीएल क्रिकेट मॅच बघत होते. त्यावेळी आरोपी सार्थक शिंदेने मंदार यांच्याशी झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून इतर साथीदारांसह शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. आरोपी सिध्दार्थने मंदार यांच्या उजव्या हातावर कोयत्याने वार करून जखमी केले. मंदार यांचा मित्र सतिश काकडे (Satish Kakade) यांना लाथा-बुक्क्यांनी व बांबुने मारहाण केली. मंदार यांचे दुसरे मित्र रोहन काकडे (Rohan Kakade)यांच्या पाठीवर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले. सदरील गुन्हयात अद्याप कोणालाही अटक केलेले नाही. गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश कारके (API Umesh Karke) करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Swargate Police Station – Maharshi Nagar,
two persons were stabbed to death due to previous enmity, a case against four

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा