Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : स्वारगेट पोलिस स्टेशन – एका दिवसात फारकत घेऊन देण्याचे आमिष दाखवून महिलेशी शारीरीक संबंध; 5 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पतीपासून एका दिवसात फारकत घेऊन देऊन लग्नाचे आमिष दाखविल्याने महिलेशी जबरदस्तीने शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. इतकेच नाही तर तिच्या घरी येऊन तिच्या ५ वर्षाच्या मुलावर अगैसर्गिक अत्याचार (Unnatural Abuse) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी (Pune Police) प्रथमेश चंद्रकांत सोकटे Prathamesh Chandrakant Sokte (रा. बारामती – Baramati News) याच्यावर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार ३ ऑगस्ट २०२२ ते २ एप्रिल २०२३ दरम्यान घडला होता.

 

याबाबत हडपसरमधील रुपीनगर येथील एका ३५ वर्षाच्या महिलेने स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये (Swargate Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३९/२३) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी प्रथमेश सोकटे याची फोनद्वारे ओळख झाली होती.
त्याने फिर्यादी यांचे पतीसोबत एका दिवसात फारकत करुन देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांना लग्नाचे आमिष दाखवले.
स्वारगेटजवळील नटराज हॉटेलमध्ये (Nataraj Hotel Swargate) त्यांच्याशी शारीरीक संबंध ठेवले.
तसेच फिर्यादी यांना वेगवेगळी कारणे सांगून ४ लाख रुपये घेतले.
फिर्यादी या आपल्या ५ वर्षाच्या मुलासह रहात असताना त्याने या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला.
ही बाब समजल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Swargate Police Station – Physical relationship with woman after luring her to
divorce her in one day; Unnatural abuse of a 5-year-old boy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा