पुणे : Pune Crime News | रंगपंचमीचा गैरफायदा घेऊन चोरट्याने स्वत:च्या चेहर्याला रंग लावला अन् रस्त्याने जाणार्या आजींना रंग लावून त्यांच्या गळ्यातील ८० हजार रुपयाचा सोन्याचा हार हिसकावून नेला. पण, या रंगावरुनच पोलीस (Pune Police) काही तासात या चोरट्यापर्यंत पोहचले अन् त्याला अटक (Arrest) केली. (Pune Crime News)
विक्रम माणिक पारखे (वय २१, रा. बालाजीनगर) असे या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी धनकवडीत राहणार्या एका ७२ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७५/२३) दिली आहे. ही घटना धनकवडीतील चैतन्यनगरमधील (Chaitanyanagar, Dhankawadi News) वसंत विहार बिल्डिंगजवळ रविवारी सकाळी पावणेनऊ वाजता घडली. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगपंचमी असल्याने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण रंग खेळत होते. आरोपीनेही त्याचा फायदा घेऊन आपली ओळख लपविण्यासाठी चेहर्याला रंग लावला.
फिर्यादी या सकाळीच रस्त्याने चालत जात होत्या. आरोपी हा त्यांच्या दिशेने आला.
त्या नको म्हणत असतानाच त्यांच्या गालाला रंग लावला.
त्याचवेळी त्यांच्या गळ्यातील ८० हजार रुपयांचा २ तोळ्यांचा सोन्याचा हार जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेला.
आजींनी तातडीने हा प्रकार पोलिसांना कळविला.
सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले. आजींच्या गालाला रंग लागला होता.
तोच पुरावा समजून पोलिसांनी असा रंग लावलेल्या मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
परिसरातील सीसीटीव्ही तपासले. परिसरात अनेकांकडे चौकशी केली.
त्यातून काही तासात विक्रम पारखे याला पकडले. त्यांच्याकडून चोरलेला सोन्याचा हार जप्त केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक शेंडे तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Taking advantage of Rangapanchami, he grabbed the gold necklace; The police arrested the thief on the spot
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Moolani’s Eye Care Centre | मुलानी आय केअर सेंटरच्या वतीने काचबिंदू जागृतीसाठी सायकल रॅली