पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कोंढवा परिसरात कोकेन विक्रीसाठी आलेल्या टाझानियातील व्यक्तीसह दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक एकने (Anti Narcotics Cell) अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 6 लाख 25 हजार रुपये किमतीचे 36 ग्रॅम 920 मिलीग्रॅम कोकेन (Cocaine), मोबाईल असा एकूण 7 लाख 58 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल (Pune Crime News) जप्त केला आहे.
बेका हमीस फाऊनी (वय 46, सध्या रा. धर्माशी सिग्नेचर सोसायटी, साईबाबानगर, कोंढवा खुर्द, मूळ रा. टांझानिया-Tanzania), अरशद अहमद इक्बाल खान (वय 42, रा. धर्माशी सिग्नेचर सोसायटी, साईबाबानगर, कोंढवा खुर्द) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार मनोजकुमार साळुंके (Police Constable Manoj Kumar Salunke) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस अॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
फाऊनी आणि खान धर्माशी सिग्नेचर सोसायटीच्या समोरील सार्वजनिक रोडवर कोकेन विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई नितेश जाधव यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून कोकेन, मोबाइल असा 7 लाख 58 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेका फाऊनी याला यापूर्वी पोलिसांनी अमली पदार्थ विक्री प्रकरणात पकडले होते. नुकताच तो जामीन मिळवून येरवडा कारागृहातून (Yerawada Jail) बाहेर आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Police Inspector Vinayak Gaikwad),
सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengle), शैलजा जानकर (API Shailaja Jankar),
मनोज साळुंके, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर, योगेश मोहिते, विशाल दळवी आदींनी ही कारवाई केली.
Web Title :- Pune Crime News | Tanzanian national arrested by crime branch for drug
trafficking again on bail; 7 lakh worth of cocaine seized
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune PMC News | सत्ताधारी आमदाराशी संबधित ‘क्रिस्टल’ कंपनीने अद्यापही महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांचे वेतन दिलेच नाही
- Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागात 8169 पदांची भरती; गृह, वित्त,
सामान्य प्रशासन आणि इतर विभागांचा समावेश - Keshav Upadhye | भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये यांची फेरनियुक्ती