Pune Crime News | शिक्षकाचे विद्यार्थीनीसोबत अश्लील कृत्य, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील चंदननगर परिसरातील एका नामांकित शाळेत (Pune School) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नराधम शिक्षकाने (Teacher) एका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत (Minor Girl) अश्लील कृत केले. हा प्रकार (Pune Crime News) उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत पीडित अल्पवयीन (वय-16) मुलीने विमातळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) शनिवारी (दि. 18) फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाघोली येथे राहणाऱ्या 55 वर्षीय शिक्षकाविरुद्ध आयपीसी 354 (अ), पॉक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार चंदननगर परिसरातील शाळेत ऑगस्ट 2019 मध्ये घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी चंदननगर परिसरातील एका शाळेत शिकते.
तर आरोपी शिक्षक हा पीडित मुलीचे कार्यानुभव विषयाचे शिक्षक आहेत. फिर्यादी मुलगी ही तिच्या शाळेतील वर्गात एकटी असताना याचा गैरफायदा आरोपीने घेतला. आरोपीने पीडित मुलीसबोत अश्लील चाळे करून तिच्याशी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत पीडित मुलीने तक्रार देताच पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सपकाळे (API Sapkale) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Teacher’s indecent act with student, shocking type in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Masuta Marathi Movie | विविध सामाजिक गोष्टींवर भाष्य करणारा ‘मसुटा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Pune Crime News | फुरसुंगीत राडा ! गाड्यांवर, घरांवर दगडफेक करत तरुणाला बेदम मारहाण; 7 जणांवर FIR

Harmanpreet Broke Rohit Record | हरमनप्रीत कौरने मोडला रोहित शर्माचा ‘हा’ विक्रम; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय