पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) गंभीर गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगार प्रथम उर्फ आकाश तुळशीदास विटकर याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई (Pune Crime News) करण्यात आली आहे. आरोपीने चतु:श्रृंगी परिसरात दहशत माजवली होती. पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत (MPDA Act) केलेली ही 8 वी कारवाई आहे.
आरोपी प्रथम उर्फ आकाश तुळशीदास विटकर Pratham alias Akash Tulshidas Witka (वय-32 रा. वडारवाडी, पुणे) हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदरांसह चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तलवार, कोयता, बॅट या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), जबरी दुखापत, वाहनांची तोडफोड (Vehicle Vandalism), दंगा, दगडफेक (Stone Pelting), विनापरवाना शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्यावर मागील पाच वर्षात 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत.(Pune Crime News)
आरोपी आकाश विटकर याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामण (PI Ankush Chintaman) यांनी वरिष्ठांच्या मार्फत पोलीस आयुक्तांना दिला होता. प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपीला एमपीडीए कायद्यान्वये नाशिक मध्यवर्ती कारागृहात (Nashik Central Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, पी.सी.बी. गुन्हे शाखा (P.C.B. Crime Branch) वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेखा वाघमारे (Senior PI Surekha Waghmare) यांनी केली.
पोलीस आयुक्तांनी आतापर्य़ंत 8 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी मोक्का (MCOCA Action) Mokka,
तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.
Web Title :- Pune Crime News | Terrorism in the Chaturshringi area criminals lodged in Nashik Jail CP Retesh Kumaarr 8th action under MPDA Act
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sanjay Naval Koli Death | कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे संजय कोळी यांचे दीर्घ आजाराने निधन