Pune Crime News | येरवडा बालसुधार गृहातून फरार झालेला आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील येरवाड्याच्या बाल सुधारगृहातून (Yerwada Balsudhagraha) विविध गंभीर गुन्ह्यातील 8 विधीसंघर्षीत बालक सुधारगृहातून पळून गेले होते. हा प्रकार 30 जानेवारी 2023 रोजी घडला होता. फरार झालेल्या एका आरोपीला पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखा युनिट एकच्या (Crime Branch Unit-1) पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई (Pune Crime News) मंगळवारी (दि.21) पुणे स्टेशन येथे केली.

पुण्यातील येरवडा इथे असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू बालसुधारगृहाच्या संरक्षण भिंतीला शिडी लावून हे विधीसंघर्षित बालक पळवून गेले होते. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) आयपीसी 363,224 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना युनिट एकच्या पोलिसांना देण्यात आल्या होत्या. (Pune Crime News)

पुण्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी विविध गुन्ह्यातील पाहिजे, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी युनिट एक कडून पेट्रोलींग केली जात होती. त्यावेळी सुधारगृहातून फरार झालेला आरोपी (रा. लोणावळा) महाराष्ट्रातून परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असून तो पुणे स्टेशन (Pune Station) येथे येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार निलेश साबळे (Nilesh Sable) यांना समजली.

युनिट एकच्या पथकाने पुणेस्टेशन येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता लोणावळा पोलीस ठाण्याच्या (Lonavala Police Station) हद्दीत त्याने व त्याच्या साथीदारांनी मिळून दारदार शस्त्राने एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केल्याची कबुली दिली. याप्रकरणी त्याच्यावर लोणावळा पोलीस ठाण्यात आयपीसी 307, 34 नुसार गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यात त्याला सुधारगृहात ठेवले होते. 30 जानेवारी रोजी तो इतर साथीदारांच्या मदतीने पळून गेला होता. आरोपीला पुढील कारवाईसाठी येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल पवार (ACP Sunil Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले
(Senior Police Inspector Sandeep Bhosale),
सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर (Ashish Kavathekar),
पोलीस अंमलदार निलेश साबळे, शशिकांत नरुटे, शुभम देसाई, विठ्ठल साळुंखे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime News | The accused, who absconded from the Yerwada Children’s Correctional Home, is in the custody of the Crime Branch

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Bypoll Election | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
पुण्याचे माजी शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्यामध्ये गुप्त खलबते!

Pune Kasba Peth Bypoll Election | ‘कसब्याची निवडणूक ही महाविकास आघाडीचे विसर्जन ठरणार’ – केशव उपाध्ये