Pune Crime News | मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीच्या विमानतळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News |  विमाननगर येथील फिनिक्स मॉल (Phoenix Mall) मधील एका कंपनीच्या शोरूम चालकाला जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देऊन खंडणी (Extortion) उकळणाऱ्या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka करण्यात आली आहे. मोक्का कारवाईनंतर फरार असलेल्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) अटक (Arrest) केली आहे.

 

दिपक संपत गायकवाड (वय-47 रा. भोसले वाडी, शिवाजीनगर लेबर ऑफिस जवळ,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विमाननगर येथील फिनिक्स मॉल (Phoenix Mall) मधील एका कंपनीच्या शोरूम चालकाकडे खंडणी मागितल्या प्रकरणी रविंद्र जयप्रकाश ससाणे (वय-49 रा. चंदनननगर, पुणे), मंगल रमेश सातपुते (वय अंदाजे  40 रा. धानोरी, विश्रांतवाडी), दिपक संपत गायकवाड (वय-40 रा. खडकी) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपी रविंद्र ससाणे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. ससाणे आणि सातपुते हे सध्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) असून गायकवाड हा फरार होता.

 

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी मुळा रोड खडकी येथे येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे (PSI Ravindra Dhaware) व पोलीस हवालदार उमेश धेंडे (Police Constable Umesh Dhende) यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मुळा रोड येथे सापळा रचला. दिपक गायकवाड हा त्या ठिकाणी आला असता सापळा रचलेल्या पोलिसांनी त्याला शिताफिने ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishore Jadhav)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता माळी (Police Inspector  Sangita Mali),
पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे पोलीस अंमलदार उमेश धेंडे, सचिन जाधव, सचिन कदम, रुपेश पिसाळ,
गिरीष नाणेकर, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | The airport police of the fugitive accused in the Mokka crime

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Bypoll Election | रोड शोनंतर हेमंत रासनेंचा PMPML मधून प्रवास, मतदारांशी साधला संवाद

Nashik Crime News | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्यास सात वर्ष सक्तमजुरी; नाशिक न्यायालयाचा निर्णय

MC Stan | रॅपर एमसी स्टॅन बॉलिवूड मध्ये येण्यासाठी सज्ज; साजिद-वाजिदकडून मिळाली ‘ही’ खास ऑफर

Pune Kasba Peth Bypoll Election | भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा निर्धारनामा आणि कार्य अहवालाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन