Pune Crime News | वाकड परिसरात वाहनांची तोडफोड करणार्‍या चौघांचा जामीन फेटाळला

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) Pune Crime News – व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपयांची मागणी करत वाहनांची तोडफोड करणा-‍या चौघांचा जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला. एम. पी. परदेशी (First Class Magistrate M. P. Pardeshi) यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला. किरण प्रकाश घाडगे Kiran Prakash Ghadge (वय २५), चंद्रकांत सीताराम गायकवाड Chandrakant Sitaram Gaikwad (वय २१), मयूर संजय अडागळे Mayur Sanjay Adagale (वय २७) आणि सागर प्रकाश घाडगे Sagar Prakash Ghadge (वय २८, सर्वजण रा. म्हातोबा नगर झोपडपट्टी, वाकड Mhatoba Nagar slum, Wakad) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत मारुती साहेबराव काळे Maruti Sahebrao Kale (वय ३०, रा. वाकड Wakad) यांनी फिर्याद दिली आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

10 जून रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास वाकड परिसरात (Wakad Area) हा प्रकार घडला. काळे हे मित्रांसह गप्पा मारत उभे असताना आरोपींनी त्याठिकाणी येत त्यांकडे महिना दोन हजार रुपये हप्त्याची मागणी केली. काळे यांनी ती देण्यास नकार दिला असताना त्यासह त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करत रिक्षांच्या काचा फोडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत (judicial custody) येरवडा कारागृहात yerwada prison (Yerwada Jail) आहेत. या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून त्यांनी जामिनासाठी अर्ज (Bail Application) केला होता. त्यास सहायक सरकारी वकील विशाल मुरळीकर (Assistant Public Prosecutor Vishal Muralikar) यांनी विरोध केला.

रोपी हे गुंड प्रवृत्तीचे असून त्यांनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे.
त्यांना जामीन मंजूर झाल्यास ते साथीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच, त्यांच्याकडून तक्रारदार व साथीदारांना हानी पोहोचविण्याचे काम होऊ शकते,
असा युक्तिवाद अ‍ॅड. मुरळीकर (Assistant Public Prosecutor Vishal Muralikar) यांनी केला.
गुन्ह्याचा तपास वाकड पोलिस ठाण्याचे (Wakad Police Station) पोलिस उप निरीक्षक दिपक कादबाने (Police Sub Inspector Deepak Kadbane) करीत आहेत.

Web Titel :- Pune Crime News | The bail of four persons who vandalized vehicles in Wakad area was rejected by pune’s First Class Magistrate M. P. Pardeshi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Delta Variant | ‘या’ 5 प्रकारच्या लोकांना आहे ’डेल्टा व्हॅरिएंट’चा जास्त धोका, व्हायरसपासून वाचण्यासाठी करा ‘ही’ 8 कामे; जाणून घ्या

स्मार्टफोन चोरीला गेला तर सर्वप्रथम करा ‘ही’ 4 कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु

स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू