Pune Crime News | पत्नीला मारहण करणाऱ्या पतीला न्यायालयाचा दणका, घरात प्रवेश बंदी

Satara Crime Court News | father and son sentenced to life imprisonment for murder; The killing was due to a dispute over watering the crop
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पत्नीला मारहाण (Beating) करुन तिचा छळ करणाऱ्या पतीला न्यायालयाने दणका (Pune Court News) दिला आहे. पतीपासून संरक्षण मिळण्यासाठी एका महिलेने दाखल केलेला अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.पी. खंदारे (Magistrate V.P. Khandare) यांनी मंजुर केला आहे. पत्नीशी संपर्क साधू नये, तसेच तिच्या घरात प्रवेश करु नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पतीकडून चारित्र्याच्या संशयावरुन छळ केला जात होता. शिवीगाळ करुन मारहाण केली जात असल्याने महिलेने न्यायालयात ॲड. पुष्कर पाटील (Adv. Pushkar Patil ) आणि ॲड. प्रणव मते (Adv. Pranav Mate) यांच्यामार्फत कौटुंबिक हिंसाचारापासून (Domestic Violence) महिलांचे संरक्षण कायद्यंतर्गत संरक्षण मिळवण्यासाठी अर्ज केला होता. (Pune Crime News)

मुख्य तक्रारीच्या सुनावणीपूर्वी अंतरिम पतीपासून तातडीने संरक्षण मिळावे अशी मागणी महिलेने केली होती. पत्नीच्या वकीलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) विविध न्यायनिवाड्याचे दाखले दिले. तसेच आवश्यक पुरावे न्यायालयासमोर सादर करुन पतीला पत्नीच्या घरात प्रवेश करण्यापासून मज्जाव करावा, अशी विनंती न्यायालयाला केली.

यावेळी विरोधी पक्षाला त्यांचे म्हणणे सादर करण्याची संधी देण्यात आली.
मात्र, त्यांनी त्यांचे म्हणणे न मांडल्याने अंतरिम आदेश करण्याची मागणी महिलेच्या वकिलांनी केली.
महिलेच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने मारहाण करु नये, तसेच पत्नीशी संपर्क साधू नये
आणि पत्नीच्या घरात प्रवेश करु नये, असे आदेश पतीला दिले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

हडपसर: व्याजाच्या पैशासाठी तरुणाला जीवे मारण्याची धमकी, 3 सावकारांवर FIR; हडपसर येथील प्रकार

कोंढवा: एक कोटी कर्ज देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक, महिलेवर कोंढवा पोलीस ठाण्यात FIR

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जाब विचारणाऱ्या वडिलांना बेदम मारहाण; नाना पेठेतील घटना

‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने 35 लाखांची फसवणूक, पुणे सायबर पोलिसांनी आरोपीला मुंबईतून केली अटक

शुक्रवार पेठ: सासूच्या छळाला कंटाळून विवाहितेची विष पिऊन आत्महत्या

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case

Satish Wagh Murder Case | पुणे : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या पूर्वीच्या भाडेकरुने पाच महिन्यापूर्वी दिली होती सुपारी; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर