पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police Station) शांतीनगर ते चव्हाण चाळ रस्त्यावरून जाणार्या नागरिकांना कोयत्याने (Koyta) धमकाविणार्या सराईत गुन्हेगाराला (Criminal On Pune Police Records) अटक केली आहे. त्याच्याकडून पुणे शहरातील वेगवेगळया पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेले 7 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 14 मोबाईलसह 1 लाख 60 हजार 890 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. (Pune Crime News)
सुलतान उर्फ हाफीज महंमद शेख Sultan alias Hafiz Mohammad Shaikh (20, रा. गल्ली नं. 18, सोमजी चौक, बालाजी किराणाजवळ (पीजी), खडीमशीन चौक, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 23 मे 2023 रोजी विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमधील तपास पथकातील पोलिस अंमलदार प्रफुल्ल मोरे, संदिप देवकाते आणि शेखर खराडे यांना एक सराईत गुन्हेगार शांतीनगर ते चव्हाण चाळ रस्त्यावरून जाणार्या नागरिकांना कोयत्याने धमकावित असल्याची माहिती मिळाली होती. (Pune Crime News)
प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचुन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने पुणे शहरातील विमानतळ पोलिस स्टेशन (Viman Nagar Police Station), भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन (Bharti Vidyapeeth Police Station), लोणीकंद पोलिस स्टेशन Lonikand Police Station (2 गुन्हे), मार्केट यार्ड पोलिस स्टेशन Market Yard Police Station (2 गुन्हे), बिबवेवाडी पोलिस स्टेशन (Bibvewadi Police Station) असे 7 गुन्हे केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्याच्याकडून वेगवेगळया कंपनीचे 14 मोबाईल हॅन्डसेट, एक लोखंडी कोयता, एक होंडा अॅक्टीवा आणि सिगारेटची पाकिटे असा एकुण 1 लाख 60 हजार 890 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार (IPS Ranjan Kumar Sharma), पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate), सहाय्यक पोलिस आयुक्त आरती बनसोडे (ACP Arti Bansode), वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय भापकर (Sr PI Dattatray Bhapkar), पोलिस निरीक्षक (गुन्हे) कविदास जांभळे (PI Kavidas Jambhale) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लहु सातपुते (PSI Lahu Satpute), पोलिस अंमलदार यशवंत किर्वे, पोलिस संपत भोसले, पोलिस संजय बादरे, पोलिस संदिप देवकाते, पोलिस प्रफुल मोरे आणि पोलिस शेखर खराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Web Title : Pune Crime News | The criminal was arrested by Vishrantwadi police! 7 crimes solved in Pune, 14 mobile phones and 1 lakh 60 thousand cash seized
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा