Pune Crime News | शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील ‘सायबर सेल’चा मोबाईलधारकांना दिलासा, हरवलेले मोबाईल परराज्यातून जप्त करुन केले परत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मोबाईल फोन हा आता प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. परंतु हा मोबाईल हरवला (Mobile Phone) तर सापडणे क्वचितच शक्य होतं. मात्र हरवलेला मोबाईल पुन्हा सापडला तर ज्याचा मोबाईल आहे त्याच्या आनंदाला पारावार उरत नाही. पुणे पोलिसांनी (Pune Police) असाच अनुभव काही जणांना करुन दिला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील (Shivaji Nagar Police Station) सायबर पोलिसांनी (Cyber Police) नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून (Pune Crime News) काढून ते संबंधित नागरिकाला परत केले आहेत.

 

पुणेकरांच्या सायबर तक्रारींची योग्य ती दखल घेण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) आणि सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik) यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर कक्ष स्थापन केला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक (API Bajirao Naik), पोलीस शिपाई आदेश चलवादी, महिला पोलीस शिपाई रुचिका जमदाडे यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलचा डेटा तयार केला. गहाळ झालेल्या मोबाईलबाबत तांत्रिक तपास केला असता हे मोबाईल केरळ (Kerala), कर्नाटक (Karnataka), आंध्रप्रदेश (Andhra Pradesh) व महाराष्ट्रातील (Maharashtra) विविध ठिकाणी सुरु असल्याची माहिती मिळाली. (Pune Crime News)

 

शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील सायबर पोलिसांनी सध्या वापरत असलेल्या मोबाईल धारकासोबत तसेच संबंधीत पोलीस ठाण्यात कन्नड, तेलगु, हिंदी, मराठी अशा विविध भाषेत संवाद साधला. पोलिसांनी हरवलेले 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे 15 मोबाईल जप्त करुन ते संबंधित तक्रारदारांना परत केले. त्यामुळे तक्रारदार यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

मोबाईल हरवल्याची तक्रार तात्काळ ऑनलाईन पुणे पोलिसांच्या वेबसाईटवर तसेच शासनाच्या Central Equipment Identity Register (CEIR)
या पोर्टलवर नोंद करावी असे आवाहन पुणे पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल (DCP Sandeep Singh Gill),
सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने (Senior Police Inspector Arvind Mane),
पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड (Police Inspector Vikram Goud), सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक,
भोलेनाथ अहिवळे (API Bholenath Ahiwale), पोलीस अंमलदार अविनाश भिवरे, बशीर सय्यद, रुपेश वाघमारे,
रणजित फडतरे, गणपत वालकोळी, आदेश चलवादी, तुकाराम म्हस्के, रुचिका जमदाडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | The ‘cyber cell’ of Pune Shivajinagar police station gave relief to the mobile phone owners, the lost mobile phones were recovered from abroad and returned.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vaidehi Parashurami | अखेर वैदेही परशुरामीने यशराज मुखाटे सोबतच्या नात्याविषयी केला मोठा खुलासा

Nia Sharma | अभिनेत्री निया शर्माच्या ग्लॅमरस अदानी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले; डीप नेक ड्रेसमध्ये दिसत आहे खूपच बोल्ड

Sania Mirza | सानिया मिर्झाचा अबु धाबी ओपनमध्ये पराभव; पहिल्याच फेरीत पडली बाहेर