Pune Crime News | दोषारोपपत्र दाखल करण्यापूर्वीच खुनातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पब्जी गेम खेळत असलेल्या एका तरुणावर कोयत्याने वार करुन खून (Murder) केल्याची घटना 31 डिसेंबर 2022 राजी रात्री आठच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यात (Pune Crime News) अटक करण्यात आलेल्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाचे (District and Sessions Court) न्यायाधीश जी.ए. रामटेके (Judge G.A. Ramteke) यांनी जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील मिथुन एस. चव्हाण (Adv. Mithun S. Chavan) यांनी दिली.

रोहीत दरेकर (Rohit Darekar) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) आयपीसी 302, 307, 504, 506, 109, 34 तसेच आर्म अ‍ॅक्ट नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन ईश्वर प्रशांत तुपसुंदर (Ishwar Prashant Tupsundar) याला अटक केली होती. ही घटना (Pune Crime News) कसबा पेठेतील अगरवाल सोसायटीच्या गेट जवळ घडली होती. पोलिसांनी दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल करण्यापूर्वीच आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

घटनेच्या दिवशी काही मुले पब्जी गेम (PUBG) खेळत असताना अज्ञात मुलांनी रोहीत दरेकर याच्यावर हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रोहीतला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रोहित दरेकर याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी ईश्वर तुपसुंदर याला अटक (Arrest) केली होती.

आरोपी तुपसुंदर याने अ‍ॅड. मिथून चव्हाण यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.
अ‍ॅड. चव्हाण यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना या घटनेत पाच ते सहा आरोपी आहेत.
मात्र आरोपी ईश्वर तुपसुंदर याच्या बाजूने कोणतेही पुरावे नाहीत, त्यामुळे ईश्वर तुपसुंदर याला जामीन मिळावा
असा युक्तीवाद अ‍ॅड. चव्हाण यांनी केला. अ‍ॅड. चव्हाण यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने दोषारोपपत्र
दाखल करण्यापूर्वी आरोपीचा जामीन मंजूर केला. या प्रकरणात अ‍ॅड. मिथून चव्हाण यांना अ‍ॅड. प्रशांत सी. पवार (Adv. Prashant C. Pawar) यांनी सहकार्य केलं.

Web Title :-  Pune Crime News | The district and sessions court granted bail to the accused in the murder even before the charge sheet was filed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Siddharth Shirole | 23 गावांच्या विकासासाठी महापालिकेकडे नियोजन सोपवावे – आमदार सिद्धार्थ शिरोळे

Mahavikas Aghadi On Shinde-Fadnavis | या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय… !महाविकास आघाडीच्या आमदारांनी चूल रचून गॅस दरवाढीचा केला निषेध

Nana Patole Taunt To Ajit Pawar | नाना पटोलेंचा अजित पवारांना टोला; म्हणाले – ‘माझं नाव नाना आहे, दादा नाही त्यामुळे…’

Sanjay Mayekar Pune | संजय मयेकर यांची भाजप प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती

Lok Sabha Elections 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? जाणून घ्या ठाकरे गट, राष्ट्रवादी व काँग्रेसला जागा किती